Take a fresh look at your lifestyle.

रिअली..! घर घेण्याचा विचार करताय? तर, वाचा ‘ही’ महत्वाची बातमी, पहा इस्टेटच्या जगामध्ये नेमके काय चाललेय

पुणे : कोरोनाने देशात किती संकटे आणली, याची यादी फार मोठी आहे. असे एखादेच क्षेत्र असेल की त्यास कोरोनाचा फटका बसला नसेल. देशातील रियल इस्टेट क्षेत्रालाही कोरोनाने जबरदस्त तडाखा दिला आहे. लोकांच्या घर खरेदी करण्याच्या स्वप्नांचा या कोरोनाने अक्षरशः चुराडाच केला आहे. याचाच फटका बँकिंग आणि होम लोन देणाऱ्या कंपन्यांना बसत आहे.

Advertisement

घरांच्या किमती कमी झालेल्या असतानाही आज कुणीही घर घेण्याचा विचार शक्यतो टाळतो. त्याचा परिणाम असा झाला आहे, की २०२१ या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत होम प्राइस इंडेक्समध्ये भारताचा नंबर आणखी खाली गेला आहे. ‘ग्लोबल प्रॉपर्टी कंसल्टेंट नाइट फ्रैंक’ च्या रिपोर्टनुसार मागील २०२० या वर्षाच्या पहिल्यात तिमाहीत भारत ४३ व्या क्रमांकावर होता. एका वर्षाचा विचार केला तर देशात घरांच्या किमती १.६ टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. २०२० वर्षातील तिसरी तिमाही आणि २०२१ वर्षातील पहिली तिमाही या दरम्यान घरांच्या किमती ०.६ टक्के वाढल्या होत्या. याच प्रमाणे २०२० मधील चौथी तिमाही आणि २०२० मधील पहिल्या तिमाही दरम्यान सुद्धा घरांच्या किमती १.४ टक्क्यांनी वाढल्या होत्या.

Advertisement

त्यानंतर मात्र देशात दुसऱ्या लाटेने थैमान घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे अनेक राज्यांनी पुन्हा लॉकडाऊन केले. त्यानंतर परिस्थिती आणखीच बिकट बनत गेली. याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर झाला. या अहवालात असेही म्हटले आहे, की घरांच्या किमतीतील महागाईचा विचार केला तर टर्कीने सलग पाचव्यांदा सगळ्यांनाच मागे टाकले आहे. या देशात घरांच्या किमती ३२ टक्क्यांनी वाढल्या आहेत. या यादीत स्पेन सर्वात मागे राहिला आहे. या देशात मागील वर्षाच्या तुलनेत यंदा घरांच्या किमती १.८ टक्क्यांनी घटल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Advertisement

दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशाचे मोठे नुकसान केले आहे. अर्थव्यवस्थेस फटका बसला आहे. त्यामुळे आरबीआयस, जागतिक बँकेसह अन्य काही जागतिक संस्थांनी यंदा देशाच्या जीडीपी वाढीच्या अंदाजात कपात केली आहे. त्यामुळे हे वर्ष देखील संकटाचेच राहणार आहे. अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणणे गरजेचे आहे. यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. काही तज्ज्ञांनी यावर उपायही दिले आहेत. आरबीआयचे माजी गव्हर्नर डी. सुब्बाराव यांनी केंद्र सरकारने कोव्हीड बाँडचा पर्याय स्वीकारावा असे म्हटले आहे. केंद्र सरकार सध्या तज्ज्ञांनी दिलेले उपाय तसेच अन्य पर्यायांचा विचार करुन त्यानुसार उपाययोजना करत आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply