Take a fresh look at your lifestyle.

पाकिस्तानने घेतलाय ‘तो’ निर्णय; भारताच्या निषेधाकडे केलेय दुर्लक्ष, पहा नेमके काय चाललेय काश्मीरमध्ये

दिल्ली : भारताच्या विरोधात काहीतरी कारवाया करण्याची पाकिस्तान कायमच शोधत असतो. कोणत्याही मुद्द्यात भारतास विरोध करता येईल असे दिसले की येथील राज्यकर्ते आणि विरोधक तो मुद्दा हातोहात उचलतात. आता पुन्हा पाकिस्तानने भारताला त्रास देण्याच्या उद्देशाने कारवाया करण्यास सुरूवात केली आहे. यावेळी पाकिस्तानने आपल्या कब्जात असलेल्या काश्मीर (पीओके) यामध्ये विधानसभा निवडणुका घेण्याचे ठरवले आहे. २५ जुलै रोजी या निवडणुका घेण्याचे नियोजन केले आहे.

Advertisement

या निवडणुकीचे नियोजन जवळपास पूर्ण झाले आहे. २१ जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्यास मुदत आहे. त्यानंतर उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाईल. पीओके मध्ये 33 आणि काश्मिरी प्रवाशांसाठी 12 सहीत विधानसभेच्या 45 जागांसाठी निवडणुका होणार आहेत. पाकिस्तानने मागील वर्षात अशाच पद्धतीने गिलगिट-बाल्टिस्तान प्रांतात निवडणूका घेतल्या होत्या. त्यावेळी सुद्धा भारताने पाकिस्ताच्या या निर्णयाचा जोरदार विरोध केला होता, मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. कारण, पाकिस्तानने याकडे दुर्लक्ष करत या प्रांतात निवडणूका घेतल्या. त्यावेळी भारताने म्हंटले होते, की सैन्याच्या ताब्यात असणाऱ्या परिसराची स्थिती बदलण्यासाठी केलेल्या कोणत्याही कारवाईसाठी कोणताही कायदेशीर आधार नाही. गिलगिट-बाल्टिस्तान क्षेत्रासह जम्मू काश्मीर आणि लदाख केंद्रशासित प्रदेश भारताचे आहेत.

Advertisement

पाकिस्तान मात्र याकडे कायमच दुर्लक्ष करत आला आहे. आता पीओकेमध्ये निवडणुका घेण्याचा डाव टाकला आहे. याआधी पीओकेमध्ये 2016 मध्ये निवडणुका झाल्या होत्या. त्यानंतर आता या वर्षात जुलै महिन्यात निवडणुका घेण्याची घोषणा पाकिस्तानच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी केली आहे. दरम्यान, पाकिस्तानने असा निर्णय घेतल्याने दोन्ही देशांमध्ये तणाव अधिकच वाढण्याची शक्यता आहे. भारताने विरोध केला असला तरी पाकिस्तान आपला निर्णय बदलणार नाही, हे नक्की. त्यामुळे अशा परिस्थितीत वाद वाढण्याचीच शक्यता जास्त आहे. भारताने काश्मीर मध्ये 370 कलम रद्द केल्यापासून पाकिस्तानचा जळफळाट झाला आहे. या मुद्द्यावर जागतिक पातळीवर आवाज उठवल्यानंतर सुद्धा कोणत्याही देशाचा पाठिंबा मिळाला नाही, त्यामुळे पाकिस्तान अधिकच अस्वस्थ झाला आहे. त्यामुळे आता अशा पद्धतीचे निर्णय घेऊन भारताला विनाकारण त्रास देण्याचा उद्योग या देशाने सुरू केला आहे. या प्रयत्नात पाकिस्तानला चीनचा पाठिंबा मिळत असल्याने त्याची हिंमत आता जास्तच वाढत चालली आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply