Take a fresh look at your lifestyle.

दुसऱ्या बॅंकेच्या ‘एटीएम’मधून पैसे काढणे झाले आणखी महाग, पाहा ‘आरबीआय’ने काय आदेश दिलाय..?

मुंबई : रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडीयाने (RBI) ने दुसऱ्या बँकाच्या ‘एटीएम’मधून पैसे काढण्याच्या शुल्कांत आणखी वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. बॅंक ग्राहकांचे रोखीचे व्यवहार कमी व्हावेत, नवे एटीएम (ATM) सेंटर्स उघडणे आणि त्यातुन व्यवस्थापनाच्या खर्चात वाढ झाल्याचे कारण देत, ‘आरबीआय’ने हा निर्णय घेतला आहे.

Advertisement

ग्राहकांना आता बॅंकेच्या ‘एटीएम’मधून पैसे काढताना दहा वेळा विचार करावा लागणार आहे. कारण दिलेली विनाशुल्क व्यवहार मर्यादा (Free Cash Widrawal Limit) संपल्यानंतर ‘एटीएम’मधून पैसे काढल्यास चुना लागण्याची शक्यता आहे.

Advertisement

‘एटीएम इंटरचेंज फी’ म्हणजेच आपल्या बॅंकेच्या एटीएम व्यतिरिक्त दुसऱ्या बॅंकेच्या एटीएममधून पैसे काढल्यास आकारण्यात येणारे शुल्क. हे शुल्क वाढविण्यास आरबीआयने मान्यता दिली आहे. पूर्वी अशा प्रत्येक व्यवहारांसाठी 15 रुपये शुल्क आकारण्यात येत होते, आता त्यात वाढ करून 17 रुपये करण्यात आले आहे.

Advertisement

‘आरबीआय’ने बदलेले हे नियम येत्या 1 ऑगस्ट 2021 पासून लागू होणार आहेत. नव्या नियमांनुसार बॅंक ग्राहकांना एटीएममधून पैसे काढण्यासाठी 5 व्यवहार विनाशुल्क असतील. गैरवित्तीय व्यवहारासाठी 5 ऐवजी आता 6 रुपये द्यावे लागणार आहेत.

Advertisement

ग्राहक शुल्का(Customer Charges) मध्येही वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार आता ग्राहक शुल्क 21 रुपये केले आहे. बॅंकांना 1 जानेवारी 2022 पासून ग्राहक शुल्काची वसुली करण्यास संमती देण्यात आली आहे. नव्या नियमांनुसार बॅंक ग्राहक दुसऱ्या बॅंकांच्या एटीएममधून मेट्रो शहरात 3 वेळा, तर छोट्या शहरांमध्ये 5 वेळा आर्थिक व्यवहार विनाशुल्क करू शकतील.

Advertisement

भारतीय बॅंक असोसिएशनच्या संचालकांच्या अध्यक्षयतेखाली जून 2019 मध्ये नेमण्यात आलेल्या समितीच्या शिफारशींवर आधारीत हा निर्णय घेतल्याचे ‘आरबीआय’ने स्पष्ट केले आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply