Take a fresh look at your lifestyle.

मराठा आरक्षणासाठी झालेय लाँग मार्चचे नियोजन; पहा नेमके काय म्हटलेय संभाजीराजे छत्रपती यांनी

कोल्हापूर / मुंबई : सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण रद्द झाल्याने मराठा जातीमधील सामाजिक भावना तीव्र झालेली आहे. याबाबत महाराष्ट्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हस्तक्षेप करण्यासाठी विनंती केली आहे. त्याचवेळी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी १६ जूनच्या मूक आंदोलनाची व लाँग मार्चची कोल्हापुरात गुरुवारी घोषणा केली आहे.

Advertisement

खासदार संभाजीराजे म्हणाले की, प्रत्येक जिल्ह्यात बैठका घेणार आहोत. लाँग मार्च हा सरकारला परवडणारा नसेल. हा लाँग मार्च मुंबई विधान भवनावर चालून जाईल. आंदोलनस्थळी कुणीच बोलणार नाही. प्रत्येक आमदार, खासदार आणि त्या जिल्ह्यातील पालकमंत्री सर्वांना सकल मराठा समाजाच्या वतीने आमंत्रित करण्यात येणार आहे. लोकप्रतिनिधींनी तिथे येऊन त्यांची भूमिका जाहीर करावी. मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात त्यांनी स्वतःची जबाबदारी निश्चित करावी. मराठा आरक्षणाची जबाबदारी केंद्र आणि राज्य सरकार दोघांची आहे.

Advertisement

त्यांनी म्हटले आहे की, पुणे लाल महाल येथून पायी जाऊन थेट मुंबईमध्ये विधान भवनावर त्याची सांगता होईल. समाज कुणाही जाती, धर्माच्या किंवा राजकीय पक्षाच्या विरोधात नाही, तो हक्काची लढाई लढत आहे. लोकशाहीत आंदोलने-मोर्चे काढणे नागरिकाचा अधिकार असून समाज नाराज असल्याने त्यांच्या भावनांशी खेळ करणे मला मंजूर नाही. मराठा समाजाला वास्तव परिस्थितीची जाणीव करून देणे माझी जबाबदारी आहे. न्यायालयाने मराठा आरक्षणविरोधी निकाल दिला आणि त्यानंतर समाजात प्रचंड खदखद आहे. १२ जूनला दुपारी कोपर्डीला आणि नंतर पुणे तिथून काकासाहेब शिंदे यांच्या स्मृतिस्थळास भेट दिली जाईल.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply