Take a fresh look at your lifestyle.

त्यामुळे मोदीराज्यात महागलेय पेट्रोल; पहा नेमकी काय परिस्थिती करून ठेवलीय

मुंबई : देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात भरमसाठ वाढ झाली आहे. या दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेस देशभरात जोरदार आंदोलने करत आहेत. काँग्रेस नेते पत्रकार परिषदा घेऊन केंद्रातील मोदी सरकारच्या कारभाराची पोलखोल करत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज कारंजा शहरात आयोजि काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात मोदी सरकारवर घणाघाती टीका केली.

Advertisement

इंधन दरवाढीच्या मुद्द्यावर त्यांनी युपीए सरकार आणि मोदी सरकारच्या कामकाजी तुलना करत आताचे सरकार जनतेची कशी लूट करत आहे, हे सांगितले. पटोले म्हणाले, की केंद्र सत्तेत आल्यापासून धान्याची भीक देत आहे. द्यायचेच असेल तर पैसे द्यावेत. केंद्र सरकार पेट्रोलच्या मूळ किमतीवर १८ रुपये प्रती लिटर रस्ते विकासाचा कर घेत आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी सरकार ते डॉ. मनमोहनसिंह सरकार यांच्या कार्यकाळात फक्त १ रुपया रस्ते विकासासाठी कर घेतला जात होता. त्यावेळी या करापोटी केंद्र सरकारच्या तिजोरीत १९ हजार कोटी रुपये जमा होत होते. काँग्रेसने या दरवाढीच्या निषेधार्थ राज्यभरात जोरदार आंदोलने केली, असे त्यांनी सांगितले.

Advertisement

मोदी सरकारने सध्या खासगीकरणाचा धडाकाच लावला आहे. रस्त्यांच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप पटोले यांनी केंद्र सरकारवर केला आहे. देशात आज खूप कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे. या काळात आता काँग्रेसचाच विचार देशाला वाचवू शकतो, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, देशात आजमितीस पेट्रोल आणि डिझेलचे दर खूपच वाढले आहेत. यामुळे नागरिकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे. इंधनाचे दर कमी करण्याची मागणी होत आहे. यासाठीच काँग्रेस पक्षाच्या वतीने देशभरात आंदोलने केली जात आहेत. या आंदोलनांद्वारे इंधनाचे दर तत्काळ कमी करण्याची मागणी केली जात आहे. इंधनावरील कर कमी करावेत, असाही पर्याय दिला जात आहे. मात्र, केंद्र सरकारने याचा अद्याप विचार केल्याचे दिसत नाही. उलट केंद्रीय मंत्र्यांनीच नजीकच्या काळात इंधनाचे दर कमी होण्याची शक्यता नाही असे म्हटले आहे. त्यामुळे दरवाढीच्या या संकटातून नागरिकांना तुर्तास दिलासा मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

Advertisement

Bhai Jagtap – भाई जगताप on Twitter: “पेट्रोल डिझेल वर केंद्र सरकारचे कर काँग्रेस सरकार असताना – पेट्रोल – ₹९.४८, डिझेल – ₹३.५६ भाजप सरकारच्या राज्यात – पेट्रोल ₹३२.९८, डिझेल – ₹३१.८३ लुटेंद्र मोदी सरकार..!!” / Twitter

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply