Take a fresh look at your lifestyle.

शेअर बाजारात घोडदौड..! सेन्सेक्स-निफ्टी तेजीच्या मार्गावर, पाहा कोणत्या शेअरने खाल्ला भाव..?

मुंबई : शेअर बाजारात गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदी केली आहे. परिणामी, सेन्सेक्स-निफ्टीने पुन्हा तेजीची वाट धरली. सेन्सेक्स 250 अंकांनी वधारला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 80 अंकांनी वधारला. तो 15800 अंकांवर गेला. दोन्ही निर्देशांकांनी नवा रेकॉर्ड स्तर गाठला.

Advertisement

आयटी सेवा, बँका, मेटल शेअरला आजच्या सत्रात मागणी होती. सेन्सेक्समधील 30 पैकी 25 शेअर तेजीत आहेत. ज्यात पॉवररग्रीड, रिलायन्स इंडस्ट्रीज, ओएनजीसी, महिंद्रा अँड महिंद्रा, एचडीएफसी बँक, मारुती , एचसीएल टेक, एसबीआय, एल अँड टी, टीसीएस, नेस्ले या शेअरमध्ये वाढ झाली आहे. बजाज फायनान्स, एचयूएल, टायटन, टेक महिंद्रा, बजाज फिनसर्व्ह या शेअरला विक्रीचा फटका बसला.

Advertisement

बँकिंग क्षेत्रात डिसीबी बँक, बंधन बँक, येस बँक, आयडीएफसी बँक, एचडीएफसी बँक, आरबीएल बँक, इंडसइंड बँक, फेडरल बँक, कोटक महिंद्रा बँक, आयसीआयसीआय बँक या शेअरमध्ये वाढ झाली आहे. मेटल क्षेत्रात सेल, जिंदाल स्टील, टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील, जिंदाल सॉ , टाटा स्टील, वेलस्पन कॉर्प शेअरमध्ये वाढ झाली.

Advertisement

सध्या सेन्सेक्सने 287 अंकांची झेप घेतली असून, तो 52587 अंकांवर आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने 80 अंकांनी वधारला असून, तो 15815 अंकावर आहे.

Advertisement

जेएसडब्ल्यू स्टीलच्या स्टॉकमध्ये गुरुवारी (ता.10) जवळपास 3 टक्के वाढ झाली. मागील तिमाहीच्या तुलनेत कंपनीच्या निव्वळ नफ्यात 28.3 टक्क्यांनी वाढ झाली. पाठोपाठ गेलच्या स्टॉकमध्ये 2 टक्क्यांनी वाढ झाली. मार्च 2021 रोजी संपलेल्या तिमाहीत कंपनीने निकृष्ट संख्येचा अहवाल दिला असूनही बाटा इंडियाच्या स्टॉकमध्ये 5 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply