Take a fresh look at your lifestyle.

केरळ-पश्चिम बंगालने करून दाखवली ‘ती’ किमया; पहा महाराष्ट्र-गुजरातपेक्षा कशात ठरलेत ते दोघेही भारी

मुंबई : देशात लोकांच्या लसीकरणासाठी लसी नाहीत म्हणून लसीकरण बंद ठेवावे लागत आहे. लसी द्या म्हणून सारखी विनंती राज्ये करत आहेत. दुसरीकडे मात्र, लसी तर नाहीतच पण, कोण किती लसी वाया घालवतय, याची यादीच केंद्र सरकारने प्रसिद्ध केली आहे. केंद्राने दिलेल्या या माहितीनुसार लसी वाया घालवण्यात झारखंड राज्य टॉपवर आहे. या राज्याने सर्वाधिक म्हणजे ३३.९५ टक्के लसी वाया घालवल्या आहेत.

Advertisement

या यादीच काँग्रेसशासित छत्तीसगड राज्याचा दुसरा क्रमांक आहे. या राज्याने त्यांना मिळालेल्या एकूण लसींपैकी १५.७९ टक्के लसी वाया घालवल्या आहेत. यानंतर मध्य प्रदेश ७.३५ टक्के, पंजाब, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांत अनुक्रमे ७.०८ टक्के, ३.९५ टक्के, ३.९१ टक्के, ३.७८ टक्के, ३.६३ टक्के आणि ३.५९ टक्के लसी वाया गेल्या आहेत, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. केरळ आणि पश्चिम बंगाल राज्यांनी मात्र एकही लसीचा डोस वाया घालवला नाही. विशेष म्हणजे, या राज्यांनी लसींची बचत केली आहे. केरळने १.१० लाख तर पश्चिम बंगालने १.६१ लाख लसींचे बचत केले आहे.

Advertisement

लसी वाया घालवण्याच्या मुद्द्यावर केंद्र आणि राज्य सरकारात वादही होत आहेत. मध्यंतरी छत्तीसगड राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली होती. लसींची माहिती राज्य सरकारकडून न घेता थेट लसीकरण केंद्राकडून घेतली जात असल्यावरही त्यांनी तीव्र आक्षेप नोंदवला होता. मात्र, त्यामुळे केंद्र सरकारच्या धोरणात बदल झाल्याचे दिसून आले नाही. आता तर नवीन लसीकरण धोरणात केंद्र सरकारने आधिकच कठोर पवित्रा घेतला आहे. राज्यांना मोफत लसी दिल्या जाणार आहेत. मात्र, जी राज्ये लसी वाया घालवतील त्यांचे निगेटीव्ह मार्किंग केले जाणार आहे. म्हणजेच, त्यांना पुढील वेळी लसी कमी मिळणार आहेत.

Advertisement

त्यामुळे या राज्यांना आता आधिक काटेकोरपणे नियोजन करावे लागणार आहे. कोणत्याही परिस्थितीत लसी वाया जाणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी लागणार आहे. केंद्राने तशा गाइडलाइन्सही राज्यांना पाठवल्या आहेत. यामध्ये लसीकरणाबाबत सविस्तर सूचना दिल्या आहेत. यानुसार राज्यांना लसीकरणाचे नियोजन करावे लागणार आहे. येत्या २१ जून पासून देशातील १८ वर्षांवरील सर्व नागरिकांच्या मोफत लसीकरणास सुरुवात करण्यात येणार आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply