Take a fresh look at your lifestyle.

करोनाच्या ‘त्या’ मुद्द्यावर भाजप झालाय आक्रमक; पहा नेमकी काय टीका केलीय ठाकरे सरकारवर

मुंबई : कोरोनामुळे देशातील लाखो लोकांना प्राण गमवावे लागले आहेत. आजही या घातक आजााराने मृत्यू होतच आहेत. सरकारकडून याची माहितीही दिली जात आहे. मात्र, या मृत्यूंच्या आकड्यांवर देशभरातच संशय व्यक्त केला जात आहे. विरोधी केंद्र आणि राज्य सरकारांवर मृत्यंची खरी आकडेवारी लपवल्याचा आरोप करत आहेत. असाच आरोप भाजपने राज्य सरकारवर केला आहे. राज्यात साडे अकरा हजार कोरोना मृत्यू लपवल्याचे समोर येत आहे. या मुद्द्यावर भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.

Advertisement

त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, की राज्यात एक लाख कोरोना रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. मृत्यूच्या बाबतीत देशात सर्वाधिक आणि जगात दहाव्या क्रमांकाचे राज्य आहे. आता आणखी ११,५०० मृत्यू लपवल्याचे उघड होत आहे. पण, लपवाछपवी करुनही राज्य सरकारच्या अपयशाचे वास्तव लपणार नाही. राज्यात कोरोनामुळे एक लाखांपेक्षा जास्त रुग्णांचे मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षात मात्र हा आकडा यापेक्षाही जास्त आहे. मृतांच्या संख्येची माहिती देणाऱ्या पोर्टलवर अतिरिक्त ११ हजार ६१७ मृत्यूंची नोंद अद्याप झालेली नाही. या नोंदी पुढील दोन दिवसात करण्याचे आदेश आरोग्य विभागाने दिल्याचे समजते.

Advertisement

दरम्यान, कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचे राजकारण देशभरातच सुरू आहे. विरोधक राज्य सरकावर कोरोनामुळे होणाऱ्या खऱ्या मृत्यूंची आकडेवारी लपवत असल्याचा आरोप करत आहेत. आणि या आरोपात तथ्य असल्याचेही सिद्ध होत आहे. कारण, बिहार सरकारने नुकत्याच केलेल्या तपासणीत कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या आकडेवारीत गडबड झाल्याचे मान्य केले आहे. राजस्थान सरकारनेही राज्यात कोरोना काळा झालेल्या सर्व प्रकारच्या मृत्यूंचे ऑडीट करण्याचा निर्णय घेतला आहे. या तपासणीचा अहवाल अद्याप मिळालेला नाही. दिल्ली सरकारही कोरोना मृत्यूंची खरी माहिती देत नसल्याचा आरोप मध्यंतरी भाजपने केला होता. मध्य प्रदेशातही अशाच पद्धतीचे राजकारण होत आहे. काही आंतरराष्ट्रीय संस्थांच्या अहवालातही भारतात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंचे जे आकडे सांगितले जात आहेत, त्यापेक्षा कितीतरी जास्त मृत्यू झाल्याचे म्हटले होते. जागतिक आरोग्य संघटनेने तर जगभरातील कोरोना मृत्यूचे जे आकडे दिले जात आहेत, त्यापेक्षा कितीतरी जास्त मृत्यू झाल्याचे म्हटले होते.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply