Take a fresh look at your lifestyle.

म्हणून अहमदनगरमध्ये एकाच दिवसात तब्बल २२४ मृत्यू; पहा नेमका काय घडलाय प्रकार

अहमदनगर : करोना विषाणूची बाधा होण्यासह यातून झालेल्या मृत्युच्या आकडेवारीत घोळ केला जात असल्याचे आरोप राज्यात विरोधी पक्ष असलेल्या भाजपने केलेले आहेत. तब्बल ११ हजार मृत्यू यामुळे कमी दिसत असल्याचा दावा केला जात आहे. त्यातच आता अहमदनगरमध्ये एकाच दिवशी तब्बल २२४ मृत्यू झाल्याची नोंद पुढे आल्याने खळबळ उडाली आहे.

Advertisement

गुरुवारी प्रशासकीय आकडेवारीत कोरोनामुळे एकाच दिवशी तब्बल २२४ जणांचा मृत्यू झाल्याचे दिसल्याने असे नेमके काय झाले की, मृत्यू झटक्यात वाढले असाच प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे. जिल्ह्यात करोनातून बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ६२ हजार ८१ इतकी आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण ९६.९१ टक्के असून हा दर काहीअंशी का होईना दिलासादायक आहे. कोरोनामुळे मृत झालेल्या रुग्णांच्या आकडेवारीत यापूर्वीही अनेकदा तफावत आढळलेली दिसते. कारण, खासगी रुग्णालयातून वेळेवर अशी आकडेवारी दिली जात नाही.

Advertisement

मृतांची आकडेवारी कमी अन् प्रत्यक्ष मृत्यूंची संख्या अधिक असे अनेकदा दिसते ते याच कारणाने. जिल्हा शल्य चिकित्सक यांचे नियंत्रण असूनही या आकड्यांमध्ये वारंवार घोळ दिसत असल्याने प्रशासन नेमके काय करीत आहे, असाच कळीचा मुद्दा उपस्थित झालेला आहे. मृत्यूची आकडेवारी वेळेवर अपडेट न केल्यामुळे हा ‘गोंधळ’ उडाला असल्याचे समोर आले आहे. त्यात सुधारणा करण्याची मागणी होत आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply