Take a fresh look at your lifestyle.

सोन्याला पुन्हा झळाळी..! चांदीच्या भावातही झाली वाढ, पहा कशामुळे झालीय वाढ..?

मुंबई : गेल्या दोन सत्रात सोने-चांदीला नफेखोरीचा फटका बसला होता. गुरुवारी सोन्याचा किमतीत २०० रुपयांची तर चांदीमध्ये ५०० रुपयांची घसरण झाली होती. मात्र आज दोन्ही धातू सावरले. जागतिक कमॉडिटी बाजारात सोन्याचा भाव 1900 डॉलरवर गेला.

Advertisement

मागील काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात होत असलेली घसरण आज थांबली. मल्टी कमोडिटी बाजारात सोन्याच्या भावात 80 रुपये, तर चांदीच्या दरातही किलोमागे 400 रुपयांची वाढ झाली.

Advertisement

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर आज (शुक्रवारी) सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 49281 रुपये झाला.  तसेच चांदीच्या भाव 72411 रुपये किलो झाला. गुरुवारच्या सत्रात सोन्यात प्रति तोळा 250 रुपयांची घसरण झाली होती. तसेच चांदीही 110 रुपयांनी घसरली होती.

Advertisement

‘गुड रिटर्न्स’ वेबसाईटनुसार आज मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव 47890 रुपये, तर 24 कॅरेटचा भाव 48890 रुपये झाला. दिल्लीत 22 कॅरेट सोन्याचा भाव 47960 रुपये, तर 24 कॅरेटचा 52310 रुपये झाला. चेन्नईत 22 कॅरेटसाठी 46400 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 50620 रुपये होता. कलकत्यात 22 कॅरेट सोन्याचा भाव 48210 रुपये असून, 24 कॅरेट सोन्याचा भाव 50910 रुपये आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply