Take a fresh look at your lifestyle.

शेतकरी आंदोलक आणखी आक्रमक; पहा नेमके काय चालू आहे दिल्लीमध्ये

दिल्ली : सहा महिने झाल्यावरही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारकडून कृषी सुधारणा विधेयकावर काहीही तोडगा काढण्यात आलेला नाही. त्यामुळे शेतकरी आंदोलक आणखी आक्रमक झालेले आहेत. भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी कोरोनाचे रुग्ण कमी झाल्यानंतर शेतकरी आंदोलनात पुन्हा नवे प्राण फुंकण्याची तयारी केली आहे.

Advertisement

जवळपास ५० हजार शेतकरी राष्ट्रीय राजधानीत पोहोचल्याच्या बातमी येत आहेत. हरियाणा, पंजाब, उत्तराखंड आणि पश्चिम उत्तर प्रदेशमधून मोठ्या संख्येने शेतकऱ्यांचे जथ्थे दिल्लीच्या सीमांवर पोहोचण्याच्या तयारीत आहेत. एकूणच यामुळे केंद्राचे दिल्ली पोलीस आणि शेजारील राज्याची पोलीस यंत्रणा सक्रीय झालेली आहे. मात्र, शेतकरी संघटनांनी अशी काही योजना असल्याचा इन्कार केला असून एकूण आंदोलकांचे नेमके लक्ष्य काय आहे, असाच संभ्रम निर्माण झालेला आहे.

Advertisement

संघटनेच्या शेतकऱ्यांना पानिपत टोल प्लाझा येथून सिंघू बॉर्डरवर येण्यास सांगण्यासह पोस्टरमध्ये दिल्लीला जाण्याचाही उल्लेख असल्याचा दावा दिल्ली पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. पोलिसांनी सिंघू, टिकरी आणि गाझीपूरमध्ये आंदोलन स्थळांसहित दिल्लीला येणाऱ्या सर्व रस्त्यांवर २४ तास सतर्कता आणि तैनाती वाढवली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून बॅरिकेड्स वाढवण्यात आले आहेत.

Advertisement

टिकैत यांनी आंदोलनाबाबत म्हटले आहे की, चर्चा केव्हा करायची आहे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांना भेटलो होतो, अफगाणिस्तानच्या राष्ट्रपतींना नव्हे. त्यासाठी केंद्र सरकारच्या परवानगीची गरज नव्हती. देशातील सध्याचे विरोधी पक्ष कमकुवत झाल्यामुळेच शेतकऱ्यांना आंदोलन करावे लागत असल्याकडे ममता बॅनर्जी यांचे लक्ष वेधले आहे. हे सरकारने सांगावे. थेट न बोलणे आणि इतरांचे न ऐकणे यात भाजप नेते प्रशिक्षित आहेत. आम्ही स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ९० वर्षे संघर्ष केला. शेतकरी आंदोलनाला तर आता कुठे सहा महिनेच झाले आहेत.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply