Take a fresh look at your lifestyle.

RTE शाळाप्रवेशाला सुरुवात; पहा अहमदनगर जिल्ह्यात कशा पद्धतीने राबवली जात आहे प्रवेशप्रक्रिया

अहमदनगर : कोरोनाच्या संकटाचा फटका राज्यातील शिक्षण क्षेत्रालाही बसला आहे. या संकटामुळे गेल्या तीन महिन्यांपासून रखडलेली आरटीई प्रवेश प्रक्रिया शुक्रवारपासून (११ जून) सुरू होणार आहे. आरटीई अंतर्गत नगर जिल्ह्यातील ४०२ शाळांमधील ३०१३ जागांसाठी ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

Advertisement

प्राथमिक शिक्षण संचालयान ७ एप्रिल रोजी प्रवेशासाठी सोडत जाहीर केली होती. त्यानंतर सोडतीत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना एसएमएसही मिळाले होते. त्यानंतर मात्र कोरोनाचा वाढत असलेला प्रसार रोखण्यासाठी राज्यात लॉकडऊन करण्याते आले. त्यामुळे शाळांतील प्रवेश प्रक्रिया रखडली होती. आता मात्र शुक्रवारपासून प्रवेश प्रक्रिया पुन्हा सुरू होणार आहे. शिक्षण विभागाने याचे नियोजन केले आहे. कोरोनाचा धोका पाहता गर्दी होणार नाही, याची खबरदारी घेण्यात येत आहे. शाळांना काही महत्वाच्या सूचना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने दिल्या आहेत. त्यानुसार निवड यादीतील विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश घेण्यासाठी २० दिवसांचा वेळ द्यावा, ११ जूनपासून शाळांनी प्रवेशाकरता पोर्टलवर दिनांक द्यावी आणि त्यानुसार प्रवेश प्रक्रियेस सुरुवात करावी, विद्यार्थ्यांच्या पालकांनी मूळ कागदपत्रे घेऊन शाळेत जाऊन तात्पुरता प्रवेश निश्चित करावा, आरटीई पोर्टलवर विद्यार्थ्यांची नावे आणि मोबाईल नंबर दिले आहेत, त्यावरुन विद्यार्थ्यांना ज्या दिवशी प्रवेश घेण्यासाठी शाळेत बोलवायचे असेल ती दिनांक नोंद करावी म्हणजे त्यानुसार मोबाइलवर एसएमएस जातील.

Advertisement

गर्दी होणार नाही अशा पद्धतीने नियोजन करुन विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेत येण्याबाबत सूचना द्याव्यात, काही वेळेस दिलेल्या तारखेस जर पालक शाळेत आले नाही तर त्यांना पुन्हा मुदत द्यावी, शाळांनी पडताळणी समितीच्या नियोजनानुसार मूळ कागदपत्रे सादर करुन प्रवेश निश्चित करावा. शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या पालकांनाही काही सूचना दिल्या आहेत. शाळा प्रवेशाबाबत मेसेज आल्यानंतर पालकांनी मूळ कागदपत्रे आणि झेरॉक्स प्रती घेऊन शाळेत हजर रहावे. विद्यार्थ्याचा तात्पुरता प्रवेश निश्चित करावा आणि शाळेला तसे हमीपत्र द्यावे. शाळेने दिलेल्या दिवशी शाळेत जाणे शक्य होत नसेल तर शाळेला तसे कळवून अन्य ज्या दिवशी शाळेत जाणे शक्य असेल तसे सांगून त्या दिवसाची मुदत घ्यावी. शाळेच्या मेसेजवर अवलंबून न राहता आरटीई पोर्टलवर बालकांचा अर्ज क्रमांक टाकून प्रवेशाच्या तारखेची खात्री करावी. शाळेचा मेसेज किंवा फोन आल्यास किंवा ऑनलाइन पोर्टलवर दिनांकाबाबत माहिती मिळाल्यास त्या दिवशी पालकांनी शाळेत हजर रहावे, अन्य दिवशी शाळेत जाऊन गर्दी करू नये असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply