Take a fresh look at your lifestyle.

सिब्बल यांनीच दिलाय काँग्रेसला घरचा आहेर; पहा नेमके काय म्हटलेय त्यांनी

दिल्ली : उत्तर प्रदेश राज्याच्या विधानसभा निवडणुका जवळ आल्या असतानाच काँग्रेसला मोठा झटका बसला. काँग्रेस नेते जितीन प्रसाद यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत कालच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे या राज्यात काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत. प्रसाद यांनी पक्ष सोडल्यानंतर राजकीय विश्वातून प्रतिक्रिया येत आहेत. भाजपसह अन्य विरोधक तर टीका करत आहेतच मात्र पक्षातीलच नेते घरचा आहेर देऊ लागले आहेत.

Advertisement

या मुद्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी पक्षाला चांगलेच सुनावले आहे, तसेच वेळीच सावध होऊन आवश्यक उपाययोजना केल्या नाहीत तर भविष्यात आणखी वाईट परिस्थिती उद्भवू शकते, असा इशारा त्यांनी दिला आहे. सिब्बल काही दिवसांपासून पक्षाच्या कार्यपद्धतीवर टीका करत आहेत. आता पक्षामध्ये काळानुसार काही बदल करणे आवश्यक असल्याचे त्यांनी याआधी अनेकदा सांगितले आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. आता अनेक नेते पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेत आहेत, त्यामुळे अडचणी वाढल्या आहेत. या मुद्द्यावर ते म्हणाले, की मला माहित आहे की नेमक्या समस्या काय आहेत याची माहिती नेतृत्वाला आहे. नेतृत्व लोकांचे ऐकेल, कारण ऐकून घेतल्याशिवाय काही होणार नाही. पक्षांतर्गत ज्या काही समस्या होत्या, त्या सोडवल्या गेल्या नाहीत हे सुद्धा खरे आहे. त्यामुळे निदान आता तरी या समस्या काय आहेत याची दखल घेऊन त्यांचे निराकरण केले गेले पाहिजे. पक्ष नेतृत्वाने ऐकलेच नाही किंवा ऐकणेच सोडून दिले तर  संघटना कोसळेल. जर तुम्ही ऐकलेच नाही तर मात्र वाईट परिस्थिती येईल, असा इशारा त्यांनी दिला.

Advertisement

जितीन प्रसाद यांनी पक्ष सोडल्याच्या मुद्द्यावर सुद्धा त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले, की प्रसाद यांनी जे काही केले त्या विरोधात मी नाही. यासाठी त्यांच्याकडे काही कारणे सुद्धा असतील मात्र त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला हे मी समजू शकत नाही. दरम्यान, काँग्रेसमध्ये अनेक राज्यात अंतर्गत कलह आणि गटबाजी वाढली आहे. या कारणांमुळेच मध्य प्रदेशसारखे मोठे राज्य गमवावे लागले. राजस्थानही अंतर्गत वाद वाढले आहेत. येथे तर सरकारमधील मंत्र्यांमध्येच तणाव निर्माण झाला आहे. पंजाबमध्ये सुद्धा काही दिवसांपासून अशीच परिस्थिती आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply