Take a fresh look at your lifestyle.

अदानी समुहातील ‘या’ कंपनीचा ‘आयपीओ’ येतोय, पहा तुमचाही होणार ‘असा’ फायदा..!

मुंबई : गौतम अदानी..भारत आणि आशियातील दुसरे श्रीमंत उद्योजक. गेल्या काही महिन्यात अदानी समूहातील सर्वच शेअर (Share) तेजीत आहेत. या शेअरनी गुंतवणूकदारांना चांगलंच मालामाल केलं आहे. भांडवली बाजारात गुंतवणूकदारांचा वाढता प्रतिसाद पाहून, अदानी समूहाने (Adani) आता व्यावसायिक विस्तारावर लक्ष केंद्रीत केलं आहे. त्यासाठी अदानी समूह लवकरच ‘आयपीओ’ (Initial Public Offer) आणणार आहे. त्या माध्यमातून सात ते साडेसात हजार कोटी रुपये उभारण्याचा अदानी समूहाचा मानस आहे.

Advertisement

‘फॉर्च्युन’चे खाद्यतेल तुम्हाला माहिती असेलच. अदानी समूहातील ‘अदानी विल्मर’ कंपनीचा हा ब्रँड आहे. ‘अदानी विल्मर’ ही अदानी समूह आणि सिंगापूरमधील विल्मर कंपनीची संयुक्त कंपनी आहे. ‘अदानी विल्मर’ची स्थापना 1999मध्ये झाली. खाद्यतेल, बासमती तांदूळ, आटा, मैदा, रवा, डाळ, बेसन अशा खाद्यवस्तूंची निर्मिती ही कंपनी करते. सध्या खाद्यतेलाचे भाव गगणाला भिडले आहेत. त्यातून खाद्यतेल क्षेत्रातील कंपन्या मालामाल झाल्या आहेत.

Advertisement

‘अदानी विल्मर’ कंपनीने 2027 पर्यंत देशातील सर्वात मोठी खाद्यवस्तू उत्पादक कंपनी बनण्याचे ठरविले आहे. भांडवली बाजारातील तेजीचा फायदा घेण्यासाठी ‘अदानी समूह’ लवकरच ‘अदानी विल्मर’ कंपनीचा ‘आयपीओ’ आणण्याच्या तयारीत आहे. त्या माध्यमातून सात ते साडेसात हजार कोटी रुपये उभारण्याचे ध्येय कंपनीने ठेवले आहे.

Advertisement

भांडवली बाजारात अदानी समूहातील 6 कंपन्या सूचिबद्ध आहेत. त्यात अदानी एन्टरप्राइसेस, अदानी पोर्ट्स, अदानी ट्रान्समिशन, अदानी पॉवर, अदानी टोटल गॅस आणि अदानी ग्रीन एनर्जी यांचा समावेश आहे. त्यातील 5 कंपन्यांचे बाजार भांडवल एक लाख कोटींहून अधिक आहे. अदानी विल्मर कंपनीची योजना सफल झाली, तर सूचिबद्ध होणारी अदानी समूहातील ही सातवी कंपनी ठरणार आहे.

Advertisement

अदानी समूहातील सहा सूचिबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल 100 अब्ज डॉलरवर गेले आहे. अशी कामगिरी करणारा अदानी समूह तिसरा उद्योग समूह ठरला आहे. यापूर्वी टाटा समूह आणि रिलायन्स ग्रुपला अशी कामगिरी करता आली आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply