Take a fresh look at your lifestyle.

म्हणून चीनचा झालाय तिळपापड; पहा कोणत्या विधेयकाने घसरलीय पायाखालची वाळू, टेक्नोलॉजीच्या जगात पोलिटिक्स जोमात

दिल्ली : अवघे जग कोरोनाच्या भयानक संकटाचा सामना करत असताना याचा गैरफायदा घेणाऱ्या चीनची मुजोरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. चीनच्या कारवायांनी अनेक देश हैराण झाले आहेत. चीनच्या महत्वाकांक्षा सुद्धा आता लपून राहिलेल्या नाहीत. कोणतेही क्षेत्र असो तेथे कोणत्याही मार्गाने का होईना पण आपलाच वचक राहिला पाहिजे, यासाठी चीन कायमच तत्पर असतो. या गोष्टी अमेरिकेच्या लक्षात आल्याने चीनच्या दादागिरीस वेसण घालण्याचा प्लानच अमेरिकेने तयार केल्याचे दिसत आहे.

Advertisement

आधी कोरोनाच्या तपासणीच्या मुद्द्यावर चीनची जबरदस्त कोंडी केली त्यानंतर आता तंत्रज्ञानाबाबत अमेरिकी संसदेत एक विधेयक मंजूर केले आहे. त्यामुळे चीनचा जळफळाट झाला असून अमेरिकेच्या या निर्णयावर चीनने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तसे पाहिले तर, आज जगात चिनी टेक्नॉलॉजीची बोलबाला आहे. कोणतेही टेक्निक असो त्याची कॉपी करण्यात चिनी मंडळी तरबेज आहेत. मोबाइलच्या दुनियेत तर चीन टॉपवरच आहे. बाकीच्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही चीनने वेगाने प्रगती केली आहे. त्यामुळे जगभरात चिनी कंपन्यांचा दबदबा निर्माण झाला आहे, हे वास्तव आहे. जगातील अनेक देशांती बाजारपेठा सुद्धा चीनने काबीज केल्या आहेत. दैनंदीन वापरातील कोणतीही वस्तू असो, मोबाइल असो, इलेक्ट्रॉनिक वस्तू असू द्या किंवा अन्य प्रकारचे तंत्रज्ञान असू द्या, सगळीकडेच चीन ठाण मांडून बसला आहे. एवढेच काय तर खुद्द अमेरिकेच्या बाजारपेठा सुद्धा चीन काबीज करू लागला आहे. अमेरिका अनेक वस्तूंसाठी आज चीनवरच अवलंबून आहे.

Advertisement

त्यामुळे बलाढ्य अमेरिकेला सुद्धा आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. चीनच्या तुलनेत अमेरिकी तंत्रज्ञानसुद्धा मागे पडत चालले आहे. चीनचा हा कावेबाजपणा आता अमेरिकेच्या लक्षात आला आहे. त्यामुळेच अमेरिकी तंत्रज्ञान आधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने सिनेटमध्ये विधेयक मंजूर करण्यात आले. या विधेयकामुळे सहाजिकच चीनच्या अडचणी वाढणार आहे. अमेरिकेने चीनला हा मोठा झटकाच दिल्याचे म्हणावे लागेल. त्यामुळेच चीनचा तिळपापड झाला आहे. या निर्णयावर चीनने तत्काळ प्रतिक्रिया दिली आहे. ‘अमेरिकेने हे विधेयक चीनच्या अंतर्गत राजकारणावर एक प्रकारे हमला आणि विकासास रोखण्याच्या उद्देशाने पारित केले आहे. अमेरिकेचे अधिपत्य अबाधित राखण्यासाठी या विधेयकात मानवाधिकारांच्या नावाखाली चीनपासून धोका असल्याचे म्हटले आहे. ज्यामुळे चीनच्या अंतर्गत राजकारणात हस्तक्षेप करता येईल आणि विकासाच्या अधिकार हिरावून घेता येतील.’ असे चीनने म्हटले आहे. या विधेयकात तैवान आणि हाँगकाँगचाही उल्लेख करण्यात आला आहे, त्यामुळे चीन जास्तच खवळला आहे. चीनच्या अंतर्गत प्रकरणात कोणत्याही दुसऱ्या देशाने दखल देणे स्वीकारले जाणार नाही, असेही चीनने म्हटले आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply