Take a fresh look at your lifestyle.

राज्य सरकारने दिलाय दिलासा; पहा एसटी महामंडळाला कसा होणार आहे फायदा

मुंबई : कोरोनामुळे आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या महामंडळासाठी राज्य सरकारने चांगली बातमी दिली आहे. राज्य सरकारने एसटी महामंडळास आधार देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकार महामंडळास ६०० कोटी रुपये देणार आहे, त्यामुळे महामंडळाच्या जवळपास ९८ हजार कर्मचाऱ्यांचे पगार देणे शक्य होणार आहे, अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे.

Advertisement

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यास मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. या काळात लॉकडाउन केल्याने कोरोना नियंत्रणात आला मात्र राज्याच्या अर्थव्यवस्थेस मोठा फटका बसला. लाखो लोकांना रोजगार गमवावे लागले, बेरोजगारीत वाढ झाली, उद्योग-व्यवसायांना टाळे लागले, देशांतर्गत व्यापाराचे कोट्यवधींचे नुकसान झाले. राज्यात बससेवा बंद असल्याने महामंडळाचेही मोठे आर्थिक नुकसान झाले, त्यामुळे महामंडळाच्या आर्थिक अडचणी वाढल्या होत्या. उत्पन्न मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांचे पगार कसे द्यायचे, बाकीचा खर्च कसा करायचा असा मोठा प्रश्न निर्माण झाला होता.

Advertisement

लॉकडाऊन काळात अत्यावश्यक वाहतुकीसच परवानगी देण्यात आली होती, त्यामुळे अन्य प्रवासी वाहतूक जवळपास बंदच होती. ५० टक्के आसन क्षमतेनेच बस चालवण्याचे सुद्धा निर्बंध होते, यामुळे एसटीचे उत्पन्न घटले होते. उत्पन्न मिळत नसल्याने इंधन खरेदी, कर्मचाऱ्यांचे पगार आणि बाकीचा खर्च कसा करायचा असा प्रश्न महामंडळा समोर निर्माण झाला होता. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केले जात होते. त्यामुळे मंत्री परब यांनी महामंडळास आर्थिक मदत देण्याची मागणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना केली होती. तसेच राज्य सरकारकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यास सकारात्मक प्रतिसाद देत राज्य सरकारने मागणी मान्य करत महामंडळासाठी आर्थिक मदत जाहीर केली आहे.

Advertisement

दरम्यान, याआधीही कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी एक हजार कोटी रुपये देण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा सहाशे कोटी रुपये देण्यात येणार आहे. राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याने संकटात महामंडळास मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांचे रखडलेले पगार देता येणार आहेत.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply