Take a fresh look at your lifestyle.

जगप्रसिद्ध श्रीमंत म्हणजे मोठे घर पोकळ वासा; पहा कशामध्ये ते करतात ‘कर्तव्यचोरी’ आणि कंजुषीही..!

मुंबई : श्रीमंत किंवा सत्ताधारी व्यक्ती म्हणजे त्याला सर्वांगीण ज्ञान आणि तो कर्तव्यदक्ष असल्याचे गृहीतक जगभर पक्के आहे. मात्र, अशी मंडळी बहुसंख्येने मोठे घर पोकळ वासा असल्याचे अनेकदा सिद्ध झालेले आहे. आताही जगभरात श्रीमंत म्हणून मिरवणाऱ्या जेफ बेजोस, एलन मस्क, मायकल ब्लूमबर्ग आणि वॉरेन बफेटसह अमेरिकेतील २५ श्रीमंत व्यक्ती इन्कमटॅक्स भरण्यात खूपच मागे असल्याचे स्पष्ट झालेले आहे.

Advertisement

न्यूज ऑर्गेनाइजेशन प्रोपब्लिकाच्या अहवालानुसार मागील काही वर्षांत तर या श्रीमंतांनी कर भरलाच नसल्याचे स्पष्ट झालेले आहे. सन २०१४ ते २०१८ दरम्यान अमेरिकेतील प्रमुख २५ अब्जाधीशांनी अत्यंत कमी कर भरला असल्याचा अहवाल प्रसिद्ध झाल्याने खळबळ उडाली आहे. अमेरिकी टॅक्स एजन्सी इंटरनल रेव्हेन्यू सर्व्हिस (आईआरएस) च्या दस्तावेजांनुसार याचा भांडाफोड झालेला आहे. २०१४ ते २०१८ दरम्यान श्रीमंतांची कमाई २९.२६ लाख कोटी रुपये असतानाही त्यांनी फ़क़्त ९९ कोटी रुपये आयकराच्या रूपात दिलेले आहेत.

Advertisement

अमॅझॉनचे सीईओ बेजोस यांनी तर करच भरला नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. कंपनीच्या शेअर्सची किंमत दुप्पट झालेली असताना आणि २०११ मध्ये त्यांची संपत्ती ८६ हजार कोटी असतानाही तोटा दाखवून मुलांच्या नावावर दोन लाख रुपयांचे टॅक्स क्रेडिट घेण्याचा प्रकार बेजोस यांनी केला आहे. श्रीमंतांनी अमेरिकेच्या कर प्रणालीतील त्रुटींचा लाभ घेऊन हा प्रकार केला आहे. कंपन्यांचे शेअर, व्हॅकेशन होम्स, यॉट आणि इतर गुंतवणुक हे करपात्र उत्पन्न नाही. हे विकून त्यावर नफा कमावला गेला तरच त्यावर कर लावता येत असल्याच्या नियमाचा लाभ त्यांना झालेला आहे. जोससह टेस्लाचे मस्क आणि बर्कशायर हॅथवेचेे सीईओ बफेट यांनीही असेच प्रकार केलेले आहेत.

Advertisement

भारतातही सामन्य जनता कर भरणे म्हणजे कर्तव्य मानते. त्याचवेळी सरकारी अधिकारी, राजकीय पुढारी आणि मोठे व्यासायिक मात्र कर चोरी करताना दिसतात. आयकर विभाग त्यांना काहीही करीत नाही. असाच प्रकार अमेरिकेतही होत असल्याचे यानिमित्ताने दिसलेले आहे. एकूणच ही कर्तव्यचोरी आणि कंजुषी नाही, तर मग काय आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply