Take a fresh look at your lifestyle.

म्हणून तयारीला लागण्याची आवश्यकता; पहा नेमका काय सल्ला दिलाय गडकरींनी

दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाट आता आटोक्यात येत आहे. मात्र, कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही. आता तर तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यातील धोका ओळखून अनेक राज्यांनी आतापासूनच नियोजन सुरू केले आहे.

Advertisement

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही आज याच मुद्द्यावर मत व्यक्त केले. त्यांनी सांगितले, की, कोरोनाच्या तिसऱ्या आणि चौथ्या लाटेचा प्रसार रोखण्यासाठी आपल्याला आतापासूनच तयारी करायला हवी. महाराष्ट्र राज्यात कशा पद्धतीने मोठे कॉम्प्लेक्स आणि रिकाम्या परिसरांमध्ये लसीकरण सुरू केले गेले, याची माहिती त्यांनी दिली. गडकरी पुढे म्हणाले, की आपण रशियाकडून ३५० टन जियोलाइट आयात केले आहे. रस्त्यांचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदारांनाही ऑक्सिजन प्रकल्प सुरू करण्याचे नियोजन केले. समाजाच्या दृष्टीने असे निर्णय फायदेशीर ठरणारे आहेत.

Advertisement

उत्तर प्रदेश राज्यात जितके ५० बेडचे दवाखाने आहेत, तेथे ऑक्सिजन प्रकल्प सुरू करणे बंधनकारक केले पाहिजे. राज्य सरकारने लवकरात लवकर याबाबत नियम तयार करावेत.याआधी ऑक्सिजन कंसेन्ट्रैटर शक्यतो विदेशातून मागवावे लागत होते, आता मात्र देशातच तयार केले जात आहेत. चार जणांना एकाच सिलिंडरद्वारे ऑक्सिजन मिळतो. रेमडेसिवीरची मध्यंतरी खूप कमतरता निर्माण झाली होती. आता मात्र, याबाबत आपण आत्मनिर्भर झालो आहोत. उत्तर प्रदेशला रेमडेसिवीर हवी असतील तर त्यांनी मागणी करावी, असे गडकरी यावेळी म्हणाले.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply