Take a fresh look at your lifestyle.

कांदा, फ्रीज आणि फळे-भाजीपाल्यामधून पसरतोय म्युकोर्मीकोसीस? पहा व्हायरल न्यूजवर नेमके काय म्हटलेय वैद्यकीय तज्ञांनी

नाशिक : सध्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात म्युकोर्मीकोसीस नावाच्या बुरशीचे रुग्ण सापडत आहेत. करोना झालेल्या अनेकांना याची बाधा होऊन वेळेवर उपचार न मिळाल्यास शेकडो मृत्यू झालेले आहेत. तसेच अनेक रुग्णांना बरे करण्यासाठी खासगी रुग्णालयात 6 ते 10 लाखांचा खर्च करावा लागला आहे. या म्युकोर्मीकोसीस नावाच्या बुरशीला काळी बुरशी म्हणून संबोधित केले जात असून कांदा, भाजीपाला आणि फ्रीजमधून ही बुरशी संक्रमित होत असल्याच्या पोस्ट शेअर केल्या जात आहेत.

Advertisement

तज्ञांनी यावर आपले मत व्यक्त केलेले आहे. एकूणच भारतात कोणात्याही रोगावरील तज्ञ आणि संशोधक पटकन तयार होतात. त्याबाबतच्या पोस्टही वेगाने शेअर केल्या जातात. आताही Wisdom नावाच्या फेसबुक पेजवरून Black fungus mucormycosis याबाबत माहिती शेअर करण्यात आलेली आहे. अनेकांनी ही माहिती आपल्या भाषेत करून सोशल मीडियामध्ये फिरवण्यास सुरुवात केली आहे. त्यात म्हटले आहे की, कोविडनंतर काळ्या बुरशीच्या आजाराला कांदा जबाबदार आहे. कांद्याच्या माध्यमातून ही बुरशी पसरते. हे शेअर होत असल्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Advertisement

सोशल मीडियावरील व्हायरल पोस्टमध्ये असा दावा केला जात आहे की, कांदा खरेदी करताना प्रत्येकाने विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. कारण यामुळे काळी बुरशीचे संक्रमण देखील होऊ शकते. बाजारातून कांदे खरेदी करताना आणि रेफ्रिजरेटरमध्ये साठवताना काळजी घेणे आवश्यक आहे. कांद्याच्या बाह्य आवरणावरील काळ्या बुरशीचा भाग बहुतेक वेळा म्यूकोरमाइकोसिस यासाठी कारण होऊ शकतो. म्हणून ज्या कोणत्याही खाद्यपदार्थावर आपल्याला काळ्या बुरशीसारखे काहीही दिसेल ते त्वरित काळजीपूर्वक नष्ट करा.

Advertisement

रेफ्रिजरेटरच्या आत रबरवरील ब्लॅक फिल्म किंवा क्रस्ट हे काळ्या बुरशीचे कारण आहे. जर या दोन्ही गोष्टींकडे दुर्लक्ष केले तर काळ्या बुरशीमुळे रेफ्रिजरेटरमध्ये ठेवलेल्या खाद्यपदार्थांमधून सहजपणे शरीरात प्रवेश होऊ शकतो, असाही दावा व्हायरल पोस्टमध्ये करण्यात येत आहे. एकूणच यामुळे आणखी एकदा भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले की, कोविडग्रस्त रूग्णांमध्ये बुरशीजन्य संसर्ग रोखण्यासाठी रक्तातील साखरेची पातळी व्यवस्थित ठेवण्याची काळजी घ्यावी. म्यूकोर्मिकोसिस म्हणजे एक काळी बुरशी नाही. ही एक चुकीची माहिती आहे. त्यामुळे त्याला काळी बुरशी म्हणूच नये.

Advertisement

कांद्याच्या बुरशीबद्दल बोलताना जयपूरच्या सीएल पंवार हॉस्पिटलचे वरिष्ठ सल्लागार आणि होमिओपॅथिक मेडिकल असोसिएशन ऑफ इंडियाचे सदस्य डॉ. एन. सी. पंवार यांनी सांगितले की, काळ्या बुरशीचे कारण कांदा नाही. भाजीपाल्यावरील बुरशी वेगळ्या प्रकारची असते. त्याने प्राणघातक संसर्ग होत नाही. कांदा किंवा इतर कोणत्याही भाज्या किंवा फळांच्या त्वचेवरील काळे डाग मातीत आढळणा सामान्य बुरशीमुळे दिसून येतात जी संक्रामक नाही. परंतु अस्वच्छता लक्षात घेऊन असे कांदे चांगले धुवा किंवा जर जास्त खराब असतील तर अजिबात वापरू नका.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply