Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ योजनेने केला चमत्कार; वाढला लसीकरणाचा वेग, पहा काय केलीय प्रशासनाने ट्रिक

दिल्ली : कोरोनास रोखण्यासाठी आता लसीकरण हाच पर्याय आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करणे गरजेचे आहे. लसीकरण मोहिमही सुरू आहे. लोक लस घेत सुद्धा आहेत. मात्र, देशात असेही लोक आहेत, ज्यांच्या मनात लसीकरणाबाबत शंका आहेत, अफवांनी मनात भिती निर्माण केली आहे.. त्यामुळे लस घेण्याची हिंमत होत नाही.. या अनाठायी कारणांचा लसीकरणावर परिणाम होत आहे. लस असतानाही लसीकरण होत नाही.

Advertisement

लोकांच्या मनातील शंका आणि भिती दूर करून त्यांना कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न होत आहे. नुसते सांगून लोकं ऐकतीलच असे नाही. मग, काय अनेक योजना सरकारी आणि काही खासगी संस्थांनी सुरू केल्या आहेत. विशेष म्हणजे, या योजनांचा सकारात्मक परिणामही दिसून येत आहे. ज्या लोकांच्या मनात शंका होत्या किंवा लस घेण्यास घाबरत होते, असे लोक सुद्धा आता लसीकरण करत आहे. अरुणाचल प्रदेश राज्यातही असेच एक गाव आहे. जेथे आधी नागरिक लस घेण्यास कचरत होते. कारण, त्यांच्या मनात अनेक शंका होत्या. लस घेतल्यानंतर गंभीर आजार होतील अशा काही अफवा असल्याने लस घेण्यास कुणी तयार होत नव्हते. मात्र, लसीकरण केल्यानंतर वीस किलो तांदूळ देण्याची योजना सुरू करण्यात आली. त्यानंतर मात्र चमत्कारच झाला. आता मोठ्या संख्येने लोक लसीकरणासाठी लसीकरण केंद्रावर येत आहेत.

Advertisement

लोअर सुबनश्री जिल्ह्यातील याजाली गावाचे क्षेत्राधिकारी ताशी वांगचूक थोंगडोक यांच्यावतीने सोमवारी ही योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेंतर्गत गावातील ४५ वर्षांवरील नागरिकांनी लसीकरण केल्यास त्यांना मोफत तांदूळ देण्यात येत आहेत. यानंतर शुक्रवारी आणि शनिवारी घरोघर जाऊन नागरिकांचे लसीकरण करण्याचा विचार आहे. या योजनेस लोकांचा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आता २० किलो ऐवजी १० किलो तांदूळ देण्याचे नियोजन केले आहे, असे थोंगडोक यांनी सांगितले. दरम्यान, देशातील १८ वर्षांवरील नागरिकांचे मोफत लसीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. येत्या २१ जूनपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे या मोहिमेचे नियोजन सुरू केले आहे. राज्यांना लसीकरणाच्या नवीन गाइडलाइन्स पाठवल्या आहेत. केंद्र सरकार लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून ७५ टक्के लस खरेदी करुन राज्यांना मोफत देणार आहे. केंद्राने ७४ कोटी लसींची ऑर्डर लस कंपन्यांना दिली आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply