Take a fresh look at your lifestyle.

आणि म्हणून टेंशन वाढले; पहा नेमकी काय समस्या उद्भवलीय भारतात

दिल्ली : देशात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असली तरी या विषाणूचा धोका कायम आहे. काही दिवसांपासून रुग्णसंख्या कमी होत आहे. नव्या रुग्णांचे प्रमाणही कमी झाले आहे. मात्र, कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण आपण कमी करू शकलेलो नाही. मृत्यूंचा आकडा रोज वाढत आहे. आज तर या संख्येने आपणास नको असलेला आकडा गाठला आहे. देशात गेल्या २४ तासात आतापर्यंत सर्वाधिक म्हणजे, ६ हजार १४८ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

Advertisement

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठा हाहाकार उडाला होता. या लाटेचा वेग इतका जबरदस्त होता, की एकाच दिवसात चार लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळून येत होते. रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण सुद्धा वाढले होते. ऑक्सिजन अभावी अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागले. असे विदारक चित्र त्यावेळी होते. आता मात्र कोरोनाची दुसरी लाट वेगाने ओसरत आहे. रुग्णसंख्या कमी होत आहे. पॉझिटिव्हिटी रेट कमी झाला आहे. कोरोनातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण सुद्धा वाढले आहे. एकीकडे अशी परिस्थिती असताना दुसरीकडे मात्र कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यू रोखण्यात अपयश येत आहे. मृत्यूदर वाढत चालला आहे. रुग्णांना चांगले उपचार देण्यासाठी प्रयत्न होत आहे. तरी देखील मृत्यूंचा आकडा वाढत चालला आहे. गेल्या २४ तासांत तर आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा गाठला आहे. देशात एका दिवसात ६१४८ जणांचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

Advertisement

मागील २४ तासात देशात ९४ हजार ५२ नवीन रुग्ण सापडले आहेत. तर १ लाख ५१ हजार ३६७ रुग्णांनी या आजारावर मात केली. देशात सध्या ११ लाख ६७ हजार ९५२ सक्रीय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली. दरम्यान, केंद्र सरकारने आता लसीकरणाच्या धोरणात बदल केला आहे. १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण केले जाणार आहे. येत्या २१ जूनपासून या मोहिमेस सुरुवात होणार आहे. त्याचे नियोजन केंद्राने सुरू केले आहे. लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना पहिल्या टप्प्यात ७४ कोटी लसींची ऑर्डर दिली आहे. केंद्र सरकार कंपन्यांकडून ७५ टक्के लसी खरेदी करुन राज्यांना मोफत देणार आहे. यासाठी राज्यांची लोकसंख्या, कोरोना रुग्णांचे प्रमाण असे काही घटक विचारात घेण्यात येणार आहेत. अशा पद्धतीचे नियोजन आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply