Take a fresh look at your lifestyle.

‘होय.. मृतांच्या आकडेवारीत घोळच..’; बाब्बो.. सरकारनेही मान्य केलाय हा घोळ..!

दिल्ली : कोरोनामुळे देशातील लाखो लोकांना प्राण गमवावे लागले आहेत. आजही या घातक आजारामुळे मृत्यू होतच आहेत. सरकारकडून याची माहितीही दिली जात आहे. मात्र, या मृत्यूंच्या आकड्यांवर देशभरातच संशय व्यक्त केला जात आहे. विरोधी पक्ष केंद्र आणि राज्य सरकारांवर मृत्यूंची खरी आकडेवारी लपवल्याचा आरोप करत आहेत. सरकार मात्र, आपण देत असलेलीच माहिती खरी असल्याचा दावा करत आहे. त्यानंतर सुद्धा हा वाद मिटला तर नाहीच उलट जास्तच वाढला आहे. काही आंतरराष्ट्रीय संस्थांच्या अहवालातही भारतातील कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या आकडेवारीवर संशय व्यक्त केल्यानंतर विरोधी पक्षांच्या आरोपांना आधिकच बळकटी मिळाली आहे.

Advertisement

आता तर थेट सरकारी आरोग्य विभागानेच मृत्यूंच्या आकड्यात हेराफेरी होत असल्याचे कबूल केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. होय, खुद्द बिहारच्या नितीश कुमार सरकारनेच हे धक्कादायक वास्तव मान्य केले आहे. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या आकडेवारीत मोठी गडबड झाली आहे. बिहार आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव प्रत्यय अमृत यांनी सांगितले, की कोरोनामुळे राज्यात ५ हजार ४२४ मृत्यू झाल्याचे जे सांगितले जात आहे, तो आकडा चुकीचा आहे. प्रत्यक्षात ७ जूनपर्यंत ९ हजार ७३५ जणांचा मृत्यू झाला आहे.

Advertisement

राज्यात कोरोना मृत्यूंच्या आकडेवारीवरुन जोरदार राजकारण सुरू झाले होते. राज्य सरकार मृत्यूंची खरी माहिती देत नसल्याचा आरोप विरोधक सातत्याने करत होते. सतत होत असलेल्या या आरोपांमुळे राज्य सरकारने कोरोनामुळे राज्यात नेमके किती मृत्यू झाले आहेत, याची तपासणी करण्याचा निर्णय १८ मे रोजी घेतला होता. त्यानुसार केलेल्या तपासणीनंतर जो अहवाल आला आहे, त्याने राज्यात खळबळ उडाली आहे. विरोधकांच्या आरोपात तथ्य असल्याचेही सिद्ध झाले आहे.

Advertisement

कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची माहिती घेण्यात अनियमितता झाल्याचे या तपासणीत प्रकर्षाने दिसून आले. या प्रकरणी खूपच असंवेदनशीलपणा केला गेल्याचे सचिव अमृत यांनी सांगितले. राज्य सरकार जिल्ह्यांकडून येणाऱ्या माहितीच्या आधारे मृत्यूंची आकडेवारी नियमितपणे जारी करत होते. मात्र, जिल्ह्यांद्वारे मृत्यूंचा जो अहवाल राज्य सरकारला पाठवण्यात येत होता, त्यामध्येच मोठी हेराफेरी केली गेली. जिल्ह्यांनी मृत्यूंची खरी माहितीच दिली नाही, त्यामुळे पुढे सगळाच घोटाळा वाढत गेला. दरम्यान, आरोग्य विभागानेच गडबड झाल्याचे मान्य केल्याने आता विरोधकांना राज्य सरकारवर आरोप करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे बिहारच्या राजकारणात पुढील काही दिवस हा मुद्दा चांगलाच गाजण्याची शक्यता आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply