Take a fresh look at your lifestyle.

मोदी सरकारच्या लसधोरणावर राहुल गांधी भडकले; केलीय ‘ती’ महत्वाची मागणी

दिल्ली : कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम देशात सुरू आहे. आता २१ जून पासून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण सुरू होणार आहे. लस घेण्याआधी नागरिकांना ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक असल्याने आधी नोंदणी करावी लागत आहे. मात्र, या मुद्द्यावर मतभेद आहेत. विरोधी पक्षांनी केंद्र सरकारच्या या धोरणावर टीका केली आहे. आता काँग्रेस नेते राहुल गांधी या पद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहे. लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे लसीकरण केलेच पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे.

Advertisement

राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे, त्यांनी म्हटले आहे, की ‘कोरोना लसीसाठी फक्त ऑनलाइन रजिस्ट्रेशन पुरेसे नाही. लसीकरण केंद्रावर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे लसीकरण केले पाहिजे. जीवनाचा अधिकार त्यांचा सुद्धा आहे, ज्यांच्याकडे इंटरनेट नाही.’ देशात सध्या लसीकरण सुरू आहे. तसेच २१ जूनपासून तर सर्व नागरिकांच्या मोफत लसीकरणास सुरुवात होणार आहे. त्यामुळे याआधीचा अनुभव पाहता या मोहिमेच योग्य नियोजन केंद्र सरकारला करावे लागणार आहे. नागरिकांना लसीकरणा आधी ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी नोंदणीही केली जात आहे. मात्र, यामध्ये अडचणी येत आहेत. देशात आजही असे कोट्यावध लोक आहेत. ज्यांना इंटरनेट म्हणजे काय हे सुद्धा माहित नाही. ग्रामीण आणि दुर्गम भागात याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे या लोकांना नोंदणीसाठी अडचणी येत आहेत. न्यायालयाने सुद्धा लसीकरणा आधी कोविन एपवर ऑनलाइन नोंदणीच्या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केले होते. धोरणे तयार करणाऱ्यांनी प्रत्यक्षात काय परिस्थिती आहे, याचेही भान ठेवावे, असे न्यायालयाने म्हटले होते.

Advertisement

त्यानंतर विरोधकांनी सुद्धा सरकारच्या धोरणावर टीका केली. यामध्ये काय अडचणी येत आहेत हे सांगितले. मात्र, तरीही या धोरणात अद्याप बदल झालेला नाही. भविष्यात यामध्ये बदल होईल का, याबाबत आताच काही सांगता येणे अशक्य आहे. यामध्ये येणाऱ्या अडचणी पाहता राहुल गांधी यांनी या मुद्द्यावर केंद्र सरकारला स्पष्टपणे सांगितले आहे. याआधी सुद्धा त्यांनी कोरोना संदर्भात अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर उपाय दिले होते. सरकारने मात्र याकडे साफ दुर्लक्ष केले. त्यानंतर आता त्यांनी लसीकरणाच्या एका महत्वाच्या मुद्द्याकडे सरकारचे लक्ष वेधले आहे. निदान यावेळी तरी केंद्र सरकार त्यांच्या म्हणण्याकडे लक्ष देईल का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply