Take a fresh look at your lifestyle.

महागाईतडाख्यात शेतकरी व जनताही त्रस्त; पहा खाद्यतेलाच्या भावाने कितीपर्यंत घेतलीय दणक्यात उडी..!

मुंबई : कोरोना काळातील लॉकडाऊनमुळे लाखो लोक आज बेरोजगार आहेत. काही जणांवर पगार कपातीचे संकट कोसळले आहे. कमी पगारात घर चालवायचे कसे, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. या काळात लोकांच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे, त्यामुळे पैशांची चणचण जाणवत आहे. असा अडचणींचा डोंगर समोर असतानाच भाववाढीचे उभे राहिले आहे. खाद्यतेलांच्या किंमतीबाबत विचार केला तर मोहरीचे तेलाचे सरसरी १७१ प्रति किलो असे आहेत. एकीकडे शेतमालास हमीभावापेक्षा खूप कमी भाव मिळत असताना प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ खूपच महाग किमतीत शेतकरी व सामान्य जनतेला घ्यावे लागत आहेत.

Advertisement

कोरोना पाठोपाठ देशातील नागरिक महागाईचा मार मुकाट्याने सहन करत आहे. गेल्या काही दिवसात जीवनावश्यक वस्तूंच भाव अशा काही वेगान वाढले आहेत की त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट उद्धवस्तच झाले आहे. इंधनाचा भडका उडाला आहे. अनेक शहरात पेट्रोलने शंभरी पार केली आहे. डाळी आवाक्यबाहेर गेल्या आहेत. खाद्यतेलांचे दर तर प्रचंड वाढले आहेत. या तेलांच्या किमतीगही कमी होण्याचे नाव घेत नाहीत. उपभोक्ता मंत्रालयाच्या वेबसाइटवर खाद्यतेलांचे नवीन दर दिले आहेत. यामध्ये मुंबईत एक किलो मोहरी तेलाची किंमत १६६ रुपये आहे. देशभरात मोहरीचे तेल सरासरी १७१ रुपये प्रति किलो या दराने विकले जात आहे. सूर्यफूल तेलाच्या दरात सुद्धा मोठी वाढ झाली आहे. मागच्या वर्षी १०७ रुपयांना मिळणारे एक किलो तेल आज १६१ रुपयांना मिळत आहेत. देशात सरासरी १७४ रुपये दराने सूर्यफूल तेलाची विक्री होत आहे.

Advertisement

मागील वर्षात पाम तेल ८२ रुपयांना मिळत होते आज मात्र १२४ रुपयांना मिळत आहे. देशभरात सरासरी १३४ रुपये दराने विकले जात आहे. शेंगादाणा तेलाचे भाव १८० रुपये झाले आहेत. मागील वर्षात १७७ रुपये होते. देशात सरासरी १७९ रुपये दराने शेंगादाणा तेल विक्री होत आहे. सोयाबीन तेलास जास्त मागणी आहे. या तेलाच्या किमती ५२ टक्क्यांनी वाढल्या आहेत. आजमितीस मुंबई शहरात सोयाबीन तेल १४८ रुपये दराने मिळत आहे. देशात सरासरी १५३ रुपये दराने सोयाबीन तेलाची विक्री होत असल्याचे म्हटले आहे.

Advertisement

दरम्यान, देशात खाद्यतेलांच्या किमती वाढत असल्याने यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न होताना दिसत नाही. मध्यंतरी केंद्र सरकारने तेलांच्या किमती करण्यासाठी राज्यांनी प्रयत्न करावेत, असे म्हटले होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकांतही सूचना दिल्या होत्या. मात्र, त्याचा काहीच उपयोग झाला नसल्याचे दिसत आहे. तेलाच्या किमती आजही जास्तच आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी मात्र वाढल्या आहेत.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply