Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ कामगारांना मिळणार दिलासा; केंद्र सरकारच्या निर्णयामुळे कोट्यावधी मजुरांना होणार फायदा

मुंबई : राज्य कामगार विमा योजना (ईएसआय) अंतर्गत संरक्षित असलेल्या कामगारांना मोठा दिलासा देणारा निर्णय केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने घेतला आहे. देशभरातील कोट्यावधी कामगारांना याचा फायदा होणार आहे. त्यामुळे ईएसआयसीधारक कामगार संघटनेने याचे स्वागत केले आहे.

Advertisement

ईएसआयसीधारक कामगार संघटनेचे राज्य सचिव प्रकाश जाधव यांनी याबाबत म्हटले आहे की, ईएसआयसीची ही मदत याेजना सर्वसामान्य कामगारांच्या कुटुंबाला आर्थिक बळ देईल. कामगाराचे काेराेनामुळे निधन झाल्यास त्याच्या वारसांना ईएसआयसीकडून दरमहा ठराविक रक्कम देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय झाला असून याबाबतचे परिपत्रक नुकतेच ईएसआयसी मुख्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे.

Advertisement
या निर्णयामधील महत्वाचे मुद्दे असे :
कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या कामगारांच्या पत्नी, मुलगा-मुलगी, विधवा आई यांच्यासह अन्य अवलंबितांना मिळणार लाभ
संबंधित कामगारांच्या सरासरी वेतनाच्या ९० टक्के आर्थिक लाभ देण्यात येणार
मृत कामगारांच्या विधवा पत्नीला दरवर्षी १२० रुपये शुल्क आकारून ईएसआयसीमार्फत आयुष्यभर वैद्यकीय सुवि
कोरोना तपासणी रिपोर्ट पॉझिटिव्ह येण्यापूर्वी किमान तीन महिने ईएसआयसीकडे नोंदणी असलेल्या कामगारांच्या कुटुंबीयांनाच हा लाभ मिळणार
मागील वर्षभरात किमान ७० दिवसांचे त्याचे योगदान ईएसआयसीकडे जमा असले पाहिजे
दीर्घ आजारपणामुळे रजेवर असलेले, कामावर असताना तात्पुरते अपंगत्व आलेल्या, प्रसूतीसाठी रजेवर असणाऱ्या महिला कामगारांच्या सुटीचे दिवस ही वरील ७० दिवसांच्या अटीमध्ये गृहीत धरले जातील
याेजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित मृत कामगारांच्या वारसांनी अवलंबून असणाऱ्या व्यक्तीचे आधार कार्ड, मृत व्यक्तीचा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट व मृत्यू प्रमाणपत्र सोबत घेऊन ईएसआयसी कार्यालयात संपर्क साधावा
प्रकरण दाखल झाल्यानंतर साधारण पंधरा दिवसांत मंजुरी देण्यात येणार असल्याचे परिपत्रकात नमूद आहे

 

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply