Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ योजनेलाही बसलाय मोठाच फटका; पहा नेमके काय संकट ओढवलेय ग्रामीण भागावर

दिल्ली : कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने देशाचे मोठे नुकसान केले आहे. या काळात कोट्यावधी लोकांचे रोजगार गेले. त्यामुळे बेरोजगारीचा दर कमालीचा वाढला आहे. शहरी भागच नाही तर ग्रामीण भागात सुद्धा रोजगाराचे संकट उभे राहिले आहे. खासगी क्षेत्रात येथे फारशा संधी नाहीत. स्वयंरोजगार आणि सरकारी योजनांच्या माध्यमातून येथे रोजगार उपलब्ध केले जातात. कोरोना काळात मात्र ग्रामीण भागात रोजगार मोठ्या प्रमाणात घटले आहेत.

Advertisement

सरकारी योजनांद्वारे मिळणाऱ्या रोजगारांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. केंद्र सरकारच्या महात्मा गांधी राष्टमीण रोजगार हमी योजनेत गावात मोठ्या प्रमाणात रोजगार दिले जातात. या योजनेद्वारे सरकार रोजगाराची हमी देते. आता मात्र कोरोनाने या योजनेसही फटका दिला आहे. मागील एक वर्षाच्या काळात या योजनेंतर्गत रोजगार ४८ टक्के घटले आहेत. मे २०२० मध्ये या योजनेंतर्गत ५०.८३ कोटी लोकांना रोजगार दिला होता. यंदा मात्र, २६.३८ कोटी लोकांनाच रोजगार देणे शक्य झाले आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत लॉकडाऊन असल्यामुळे सर्व काही ठप्प होते. नागरिकांना घराबाहेर पडता येत नव्हते. उद्योग-व्यवसाय बंदच होते. या काळात गावात विकासकामे रखडली. त्यामुळे रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आता या बेरोजगार झालेल्या लोकांना पुन्हा रोजगार मिळवून देण्याचे मोठे आव्हान सरकारसमोर आहे.

Advertisement

जेएनयूमधील आर्थिक विभागाचे प्राध्यापक हिमांशु यांनी सांगितले, की कोरोनाची दुसरी लाट ग्रामीण भागात अगदी लहान गावात पोहोचली. त्यामुळे रोजगार हमी योजनेत रोजगाराच्या मागणीत २६ टक्के घट झाली. त्यामुळे रोजगार कमी झाले. मागील वर्षी लॉकडाऊन काळात मोठ्या संख्येने लोक गावात आले होते. त्यांनी पुन्हा शहरांत परतण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ग्रामीण भागात यंदा रोजगारात मोठी घट झाल्याचे दिसून आले. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या काळात अनेक विकासकामे थांबवण्यात आली होती, त्याचाही परिणाम दिसून आला. केंद्र सरकारने २०२१-२२ या आर्थिक वर्षात रोजगार हमी योजनेसाठी ७३ हजार कोटी रुपये दिले आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत ही रक्कम ३४.५२ टक्के कमी आहे. २०२०-२१ मध्ये केंद्र सरकारने १ लाख ११ हजार ५०० कोटी रुपये निधी दिला होता. लॉकडाऊन काळात शहरातून लोक गावात आले होते. त्यांचा विचार करुन सरकारने अतिरिक्त ४० हजार कोटी रुपये दिले होते.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply