Take a fresh look at your lifestyle.

आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सुब्बाराव यांनी दिलेत ‘ते’ पर्याय; पहा नेमके काय म्हटलेय त्यांनी

मुंबई : अर्थव्यवस्थेस संकटातून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने ‘कोव्हीड बाँड’ सारख्या पर्यायांचा विचार केला पाहिजे, असे रिजर्व बँकेचे माजी गव्हर्नर डी. सुब्बाराव यांनी सांगितले. या पर्यायानेही जर फायदा झाला नाही तर आरबीआयने चलनी नोटांची अतिरिक्त छपाई करावी, हाच पर्याय आहे, असे त्यांनी सांगितले. सध्याच्या कोरोना संकटाच्या काळात देशाच्या अर्थव्यवस्थेचे नुकसान झाले आहे. २०२०-२१ या वर्षात अर्थव्यवस्थेत ७.३ टक्के घसरण झाली आहे. या आर्थिक वर्षात वित्तीय तूट ६.८ टक्के इतकी वाढली आहे. त्यामुळे या संकटातून अर्थव्यवस्थेस पूर्वपदावर आणायचे असेल तर केंद्र सरकारने कर्ज उभारायला हवे. यासाठी बजेट तरतुदीनुसार कर्ज घेण्यापेक्षा कोविड बाँडाचा पर्याय निवडावा, ते जास्त योग्य राहिल असे त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशाच्या अर्थव्यवस्थेची वाताहत झाली आहे. अनेक जागतिक संस्था, जागतिक बँक तसेच आरबीआयनेही देशाच्या जीडीपीत कपात होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने हा काळ आव्हानांचा राहणार आहे. त्यामुळे या संकटाच्या काळात अर्थव्यवस्थेस पुन्हा उभारी देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. विविध पर्यायांचा विचार करुन त्यानुसार नियोजन आणि कार्यवाही करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार आणि केंद्र सरकारमधील प्रशासकीय धुरीण आता सुब्बाराव यांच्या या सूचनांकडे कसे पाहते, हेही महत्वाचे आहे. कारण, तज्ञ किंवा कोणाचेही न ऐकण्याचा कित्ता गिरवण्याची आता केंद्र सरकारच्या प्रशासनाला सवय लागली आहे.

Advertisement

अतिरिक्त नोटांची छपाई करण्याचाही पर्याय आहे. मात्र, या व्यतिरिक्त दुसरा कोणताच पर्याय दिसत नसेल तरच या पर्यायाचा विचार करावा. अन्यथा नोटा छपाईचा पर्याय स्वीकारू नये असेही सुब्बाराव यांनी सांगितले. दरम्यान, देशात आता कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत आहे. रुग्णसंख्या वेगाने कमी होत आहे. नवे रुग्ण सापडण्याचे प्रमाण सुद्धा कमी झाले आहे. त्यामुळे राज्यांनी निर्बंधात सवलती देण्यास सुरुवात केली आहे. याचा परिणाम म्हणून दैनंदीन व्यवहार काही प्रमाणात सुरू झाले आहेत. अर्थव्यवस्थेसाठी या गोष्टी सकारात्मक ठरणार आहेत.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply