Take a fresh look at your lifestyle.

कोरोनाबाधित मुलांना ‘हे’ औषध देऊ नका रे..! आरोग्य मंत्रालयाने काय म्हटलंय पहा..?

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लहान मुलांना मोठ्या प्रमाणात लागण झाल्याचे समोर आले होते. कोरोनाची तिसरी लाट तर चिमुकल्यासाठी आणखी घातक ठरणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने गाईडलाईन्स जारी केल्या आहेत.

Advertisement

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आरोग्यसेवा महासंचालनालयाने (DGHS) आज (गुरुवारी) कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून मुलांना कसे वाचवायचे, काय उपचार करायचे, याबाबत सूचना दिल्या आहेत.

Advertisement

‘डीजीएचएस’ने केलेल्या सूचना..

Advertisement
  • पाच वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांना मास्क घालणे अनिवार्य नाही; पण 6 ते ११ वर्षांवरील मुलांना मास्क घालण्याचा सल्ला पालक आणि डॉक्टरांच्या देखरेखीखाली दिला जावा.
  • लहान मुलांना रेमडेसिवीर (remdesivir) आणि स्टेरॉईड (steroids) देऊ नये.
  • मुलांची शारीरिक क्षमता तपासण्यासाठी सहा मिनिटांची त्यांची आरोग्य चाचणी करावी.
  • संसर्गाची चाचणी करण्यासाठी सीटी स्कॅनचा उपयोग तर्कसंगतपणे करावा.

रेमडेसिवीर इंजेक्शनमुळे 3 ते 18 वर्षे वयोगटातील बरे झालेल्या मुलांचे पर्याप्त आकडे उपलब्ध नाहीत. अशा परिस्थितीत मुलांवर रेमडेसिवीरचा वापर करू नये. छातीचे सीटी स्कॅन केल्याने उपचारांमध्ये थोडीशी मदत होते. अशा परिस्थितीत डॉक्टरांनी कोरोना रुग्णांमधील निवडक केसेसमध्ये ‘एचआरसीटी’ करण्याचा निर्णय घेतला पाहिजे, अशी सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आरोग्यसेवा महासंचालनालयाने केली आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply