Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ पद्धतीने देशात झालेत तब्बल ४१ लाख कोटी रुपयांचे व्यवहार; पहा नेमकी कशात झाल्य्य क्रांती

दिल्ली : आजच्या डिजीटल युगात तंत्रज्ञानाचा वापर खूपच वाढला आहे. स्मार्टफोन आल्याने तर या क्षेत्रात क्रांतीच झाली आहे. काम कोणतेही असो, प्रश्न कोणताही असो, काहीही अडचण असो किंवा काही ज्ञानार्जन करायचे म्हटले तर या सगळ्या गोष्टींचे उत्तरे आज स्मार्टफोनच्या मदतीने तुम्ही अगदी घरबसल्या मिळवू शकता. बँकेचे कामकाज असले तरी त्यासाठी आता बँकेत जाण्याची काहीच गरज राहिलेली नाही. बँकेतून पैसे काढायचे असतील किंवा कुणाला पैसे द्यायचे असतील तर तुम्ही ऑनलाइन पद्धतीने व्यवहार करू शकता. आणि आज याच पद्धतीचे चलन खूप वाढले आहे.

Advertisement

कोरोनाच्या संकटाने तर लोकांना ऑनलाइन पद्धतीने कामकाज करण्यास भागच पाडले आहे. या काळात डिजीटल व्यवहारांचा वाढता आलेख पाहिल्यानंतर हे आपल्या सहज लक्षात येईल. कोरोना काळात डिजीटल व्यवहार मोठ्या प्रमाणात होत आहेत. २०२०-२१ या एकाच वर्षात ‘युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस’ (युपीआय) च्या माध्यमातून देशभरात तब्बल २२३३ कोटी व्यवहार झाले आहेत. या व्यवहारांच्या माध्यमातून एकूण ४१ लाख कोटी रुपयांची देवाणघेवाण झाली आहे. देशात ‘युपीआय’ ची सुरुवात सन २०१६ मध्ये करण्यात आली होती. पहिल्या वर्षात म्हणजे २०१६-१७ मध्ये या माध्यमातून एकूण १.८ कोटी व्यवहार केले गेले. त्यानंतर या पद्धतीने डिजीटल व्यवहारात वाढ होत गेली. कोरोनाचे संकट आल्यानंतर यामध्ये आधिकच वाढ झाली. मागील चार वर्षांच्या तुलनेत २०२०-२१ या एकाच वर्षात डिजीटल व्यवहारात तब्बल १२०० पटींनी वाढ नोंदवण्यात आली. मात्र, यामध्ये पैशांची देवाणघेवाण म्हणजे ट्रांजेक्शन व्हॅल्यू फक्त ५० पटींनी वाढली आहे. गेल्या काही वर्षात लहान स्वरुपाच्या व्यवहारांत वेगाने वाढ झाली आहे.

Advertisement

युपीआय सुविधा घेण्यासाठी आधी वर्चुअस पेमेंट एड्रेस तयार करावा लागतो. त्यानंतर हा एड्रेस बँक खात्यास लिंक करावा लागतो. त्यानंतर बँक खाते नंबर, आयएफएससी कोड लक्षात ठेवण्याची सुद्धा गरज पडत नाही. फक्त मोबाइल नंबर असला तरी व्यवहार करता येतात. कुणाला पैसे पाठवायचे असतील तर फक्त युपीआय आयडीची  आवश्यकता असते. युपीआय एक सुरक्षित बँकिंग माध्यम आहे. आज देशात कोट्यावधी नागरिक या माध्यमाद्वारे डिजीटल व्यवहार करत आहेत. कोरोना काळात ऑनलाइन व्यवहारांचे प्रमाण खूप वाढले आहे. त्यामुळे लोकांच्या वेळेत सुद्धा बचत होत आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यातही यामुळे काही प्रमाणात मदत मिळत आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply