Take a fresh look at your lifestyle.

कमालच हाये की.. चक्क समुद्रात ‘त्या’ पद्धतीने वसवले जाणार नवे शहर, लागणार चक्क ८ कोटी टन माती..!

मुंबई : जगात रोजच काहीतरी आश्चर्यकारक गोष्टी घडत असतात. ही आश्चर्ये कधी निसर्गाची असतात तर कधी माणूस स्वतःच्या कौशल्यांच्या बळावर असा काहीतरी चमत्कार करुन दाखवतो. आता हेच पहा ना, समुद्राच्या पाण्यात अगदी कोट्यावधी टन माती टाकून नवीन शहर तयार करता येऊ शकेल का, पहिल्यांदा ज्यावेळी हा विचार आपल्या डोक्यात येईल, त्यावेळी त्यास शक्यच नाही, असे उत्तर मिळेल. पण, असे आजिबात नाही. कारण, याआधीही जगात अशा चमत्कारिक गोष्टी घडल्या आहेत. आता डेन्मार्क नावाचा छोटासा पण आनंदी देश असा चमत्कार करण्याच्या तयारीत आहे…

Advertisement

होय, समुद्रात कोट्यावधी टन माती टाकून नवीन शहर, छोटेस बेट म्हणा हवे तर.. तयार करण्याचा निर्णय या देशाने घेतला आहे. देशाच्या संसदेने या प्रकल्पास मंजुरी सुद्धा दिली आहे. त्यामुळे लवकरच कामकाजास सुरुवात होणार आहे. या नवीन शहरात किमान ३५ हजार लोकांना घरे उपलब्ध करुन देण्याचा सरकारचा विचार आहे. आताच्या शहरांमध्ये मिळणाऱ्या सर्व सुविधा या शहरात सुद्धा मिळतील. समुद्राची पाण्याची पातळी सातत्याने वाढत आहे, त्यामुळे भविष्यात संकट आलेच तर कोपेनहेगन बंदरास सुरक्षित करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे बीबीसीच्या अहवालात म्हटले आहे.
स्थानिक प्रसारमाध्यमांच्या रिपोर्ट नुसार या नव्याने तयार होणाऱ्या बेटाचा आकार साधारण ४०० फुटबॉल मैदानांच्या आकाराइतका असेल. यासाठी जवळपास ८ कोटी टन मातीची आवश्यक असेल.

Advertisement

लिटेनहोम नावाच्या या बेटास रिंग रोड, टनल आणि मेट्रो लाइनच्या माध्यमातून कोपेनहेगन शहरास जोडण्यात येणार आहे. या बेटाचा आकार साधारण २.६ वर्ग किलोमीटर इतका असेल. या प्रकल्पास या वर्ष अखेरीस काम सुरू करण्याचे सरकारचे नियोजन आहे. नियोजनानुसार कामकाज झाले तर २०७० पर्यंत बेट तयार होईल. या नवीन बेटाच्या चारही बाजूंनी एक बांध तयार केला जाणार आहे. ज्यामुळे समुद्रातील पाण्याची वाढती पातळी आणि तुफानी लाटांपासून या बंदराचे संरक्षण करणे शक्य होईल.

Advertisement

दुसरीकडे मात्र, या शहराचे काम सुरू होण्याआधीच अडचणी येण्यास सुरुवात झाली आहे. काही पर्यावरण गटांनी या विरोधात युरोपिय न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या योजनेचे काम सुरू झाले तर कच्च्या मालाची वाहतूक करणारे जवळपास ३५० ट्रक रोज कोपेनहेगन शहरातून ये-जा करतील. यामुळे शहरात वाहनांची संख्या वाढेल आणि प्रदूषणातही वाढ होईल. शहरातील नागरिकांनीही यास विरोध केला आहे. काही पर्यावरणवाद्यांनीही सरकारच्या या प्रकल्पास विरोध केला आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply