Take a fresh look at your lifestyle.

भारताला बसणार असाही झटका; पहा नेमके काय म्हटलेय जागतिक बँकेने

दिल्ली : कोरोनाच्या संकटाचा भारतास मोठा फटका बसला आहे. या विषाणूने देशाच्या अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान केले आहे. देशांतर्गत व्यापाराचे कोट्यावधींचे नुकसान झाले. लाखो लोकांना रोजगार गमवावे लागले, उद्योग-व्यवसायांना टाळे लागले. त्यामुळे सहाजिकच देशाचा आर्थिक विकास सुद्धा मंदावला आहे. जीडीपी कमी झाला आहे. आता तर जीडीपी आणखी कमी होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. जागतिक बँकेने आपल्या एका अहवालात भारताच्या जीडीपी वाढीच्या अंदाजात कपात केली आहे. २०२१ या वर्षात भारताचा जीडीपीत फक्त ८.३ टक्के वाढ होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे.

Advertisement

याआधी मात्र भारताच्या जीडीपीत १०.१ टक्के वाढीचा अंदाज जागतिक बँकेने व्यक्त केला होता. आता मात्र देशातील सध्याची परिस्थिती पाहता बँकेने या अंदाजात कपात केली आहे. कोरोनाचे संकट येण्याआधी भारताची अर्थव्यवस्था भक्कम होती. कोरोना आला आणि सगळीच वाताहत झाली. पहिल्या लाटेत लॉकडाऊन केले. लॉकडाऊनने कोरोना रोखला. मात्र, अर्थव्यवस्था पुरती कोलमडली. लॉकडाऊन नंतर अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असतानाच दुसरी लाट आली. यावेळी कोरोनाचा मार इतका जबरदस्त होता, की एकाच दिवसात चार लाखांपेक्षा जास्त रुग्ण सापडत होते. यावेळीही राज्यांनी लॉकडाऊन केले. याचाही परिणाम अर्थव्यवस्थेवर पडला. आर्थिक विकासाचा दर कमी झाला, तसेच जीडीपीही कमी झाला. आरबीआयने सुद्धा जीडीपीचा अंदाज घटवला आहे. २०२१-२२ मध्ये देशाच्या जीडीपीत ९.५ टक्के वाढीचा अंदाज बँकेने व्यक्त केला आहे.

Advertisement

जागतिक बँकेचे अध्यक्ष डेविड मालपास यांनी सांगितले, की कोरोनची दुसरी लाट येण्याआधी भारताने कोरोनाच्या संकटाचा सामना करताना चांगली प्रगती केली होती. दुसऱ्या लाटेत मात्र पुन्हा लॉकडाऊन करण्यात आला, आणि याचा फटका देशाच्या अर्थव्यवस्थेस बसला आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा लस उत्पादक देश आहे. सध्या लसींचा पुरवठा वेगाने केला जात आहे. त्यामुळे भविष्यात कोरोना रुग्णांची संख्या आणखी कमी होईल आणि सध्या तर त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply