Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ भागात मुसळधारची शक्यता; पहा हवामान खात्याने काय सांगितलाय पावसाळी अंदाज

मुंबई : देशात मान्सून दाखल झाला असून अगदी सुरुवातीलाच मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. राज्यात सुद्धा अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. राजधानी मुंबईत तर कालपासून पाऊस सुरू आहे. यानंतर राज्यात आणखी काही जिल्ह्यात पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे.
मुंबईसह पुणे, रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पुढील तीन तासात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Advertisement

मान्सून पुढील काही तासात राज्यात दाखल होईल, असा अंदाज आहे. मात्र, मान्सून येण्याआधीच राज्यात अनेक ठिकाणी पाऊस सुरू झाला आहे. मुंबई शहरात कालपासूनच पाऊस सुरू आहे. त्यामुळे शहर आणि उपनगरात अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. यंदा देशात १०१ टक्के पाऊस होईल, असा सुधारीत अंदाज विभागाने दिला आहे. मागील १२ तासांत मुंबईत १४० ते १६० मिमी पाऊस झाला. तर गेल्या २४ तासांत ५०० मिमी पावसाची नोंद घेण्यात आली. यानंतर पुढील तीन तासात पावसाची तीव्रता आणखी वाढणार आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे.

Advertisement

या व्यतिरिक्त पुणे, रायगड, पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पुढील तीन तासात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात सध्या अनेक ठिकाणी पाऊस होत आहे. काही जिल्ह्यात ढगाळ हवामान असून वारे वेगाने वाहत आहेत. या जिल्ह्यात पावसाचा अंदाज दिला नसला तरी पावसाचेच वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे या जिल्ह्यातही पावसाची शक्यता नाकारता येत नाही.

Advertisement

दरम्यान, यंदा कडाक्याच्या उन्हाळ्यातही अनेक वेळा पावसाचा अनुभव आला. राज्यात बहुतांश ठिकाणी अवकाळी पाऊस पडला. काही ठिकाणी गारपीटही झाली. त्यानंतर आलेल्या तौक्ते चक्रीवादळाने हाहाकार उडवला. या वादळाच्या प्रभावाने सुद्धा अनेक जिल्ह्यात पाऊस पडला. यास चक्रीवादळाने पश्चिम बंगाल आणि ओदिशा राज्यात थैमान घातले. या वादळामुळेही अन्य राज्यात पाऊस पडला. निसर्गात घडलेल्या या घटनांनी ऐन कडाक्याच्या उन्हाळ्यात नागरिकांना पावसाळ्याचा अनुभव मिळाला. त्यानंतर मान्सूनचे आगमन झाले आहे. त्यामुळे अनेक राज्यात मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. राज्यात केव्हाही मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. मात्र, त्याआधीच काही जिल्ह्यात मुसळधार पावसास सुरुवात झाली आहे. जिल्हा प्रशासनाकडून आढावा घेऊन त्यानुसार कार्यवाही करण्यात येत आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply