Take a fresh look at your lifestyle.

म्हणून पावसाच्या मुद्द्यावर भडकला आहे भाजप; पहा नेमकी कोणत्या मुद्द्यावर केलीय टीका

मुंबई : देशात मान्सून दाखल झाल्यानंतर अनेक राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. राज्यात अनेक ठिकाणी पाऊस होत आहे. तसे आता पावसाच्या मुद्द्यावरही राजकारणी मंडळींनी राजकारण सुरू केले आहे. विशेषतः या मुद्द्यावर भाजप आक्रमकपणे राज्य सरकारवर आरोप करत आहे.
मुंबईत कालपासून पाऊस सुरू आहे. त्यामुळे शहर आणि उपनगरात अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. पालिकेकडून नालेसफाईचा दावा केला जात असला तरी तो फोल ठरला आहे. नालेसफाईच्या कामात मागील पाच वर्षात एक हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आमदार आशिष शेलार यांनी केला होता. त्यानंतर आता भाजप आमदार अतुल भातखळकर यांनीही राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.

Advertisement

मुंबईत मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवरुन त्यांनी राज्य सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, की ‘मुंबई शहरातील नालेसफाईच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचे आम्ही आधीपासूनच सांगत होतो. ते आज उघड झाले आहे. आता राज्य सरकारकडून बहुधा पावसाची जबाबदारी सुद्धा मोदी सरकारवर ढकलली जाईल. आता मोदींनीच यातून मार्ग काढावा, असे सरकारने म्हणू नये, इतकेच आम्हाला अपेक्षित आहे.’ दरम्यान, राज्यात आज बहुतांश जिल्ह्यात हवामान ढगाळ आहे. वारे वेगाने वाहत आहेत. काही जिल्ह्यात पाऊस होत आहे. पुढील काही वेळात मुंबईसह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे आणि पुणे या जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबईत कालपासूनच पाऊस सुरू आहे. आता तर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पहिल्याच पावसात शहर आणि उपनगरात पाणी साचले आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच आता हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे प्रशासनास आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Advertisement

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही याबाबत आढावा घेतला. मुंबईतील परिस्थितीची माहिती घेतली. तसेच साचलेल्या पाण्याचा निचरा तातडीने कसा करता येईल, या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. दरम्यान, मुंबईतील पावसाच्या मुद्द्यावर सध्या राजकारणही जोरात सुरू झाले आहे. भाजपचे नेते जोरदार टीका करत आहेत. नालेसफाईच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप सुद्धा केला जात आहे. या मुद्द्यावर सत्ताधारी पक्षाकडून अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यांच्याकडून काय प्रतिक्रिया दिली जाते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply