Take a fresh look at your lifestyle.

पायलटांचे वाग्बाण विमान सुसाट, भाजपला झटक्यात केले सपाट; पहा नेमके काय झालेय पोलिटिकल फिल्डवर

जयपूर : भाजपला देशात सध्या कोणताच पर्याय नाही असा समज दृढ होत असताना काँग्रेसने काही राज्यांत भाजपला जोरदार टक्कर दिली. एवढेच नाही तर भाजपचा दणदणीत पराभव करुन पंजाब, राजस्थान, छत्तीसगड या राज्यांत सत्ता सुद्धा मिळवली. आता मात्र, सत्ता टिकवण्यात काँग्रेसची चांगलीच दमछाक होत आहे. याचे कारण दुसरे काय असणार अंतर्गत कलह आणि गटबाजी.

Advertisement

या कारणांमुळेच काँग्रेसला एका पाठोपाठ एक झटके बसत आहेत. असे असले तरी पक्षात आजही असे काही निष्ठावंत आहेत, की नाराज असले तरी प्रत्येक वेळी पार्टीस आधार देऊन विरोधकांचे राजकारणाचे डाव उधळून लावत आहेत. असाच एक प्रकार आज राजस्थानच्या राजकारणात पाहण्यास मिळाला. त्यामुळे विरोधी भाजपचे फोडाफोडीचे डाव फसल्याचे पुन्हा एकदा दिसले. याबाबत आधिक माहिती अशी, की काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी काही दिवसांपूर्वी एका इंग्रजी वृत्तपत्रास मुलाखत दिली होती. त्यात त्यांनी आपण नाराज असल्याचे स्पष्टपणे सांगितले. दहा महिने उलटून गेले तरी जी आश्वासने दिली होती, ती पूर्ण केली नाहीत. ज्या कार्यकर्त्यांनी पक्षास सत्तेत आणण्यासाठी अपार परिश्रम केले, त्यांचेच म्हणणे आज ऐकले जात नाही, अशी टीका पायलट यांनी केली होती.

Advertisement

यानंतर भाजपने राजकारणाची संधी ओळखत राज्य सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया म्हणाले, की ‘हा काँग्रेसच्या घरातील वाद आहे. मात्र, यामुळे राज्यातील जनतेस नाहक त्रास सहन करावा लागत आहे. काँग्रेसमधील वादास भाजप कारणीभूत असल्याचा आरोप मुख्यमंत्री गेहलोत यांनी केला होता. आता मात्र खरी वस्तूस्थिती लोकांसमोर आली आहे.’  भाजप नेते राजेंद्र राठोड यांनीही ट्विट करत काँग्रेसवर निशाणा साधला. ते म्हणाले, की ‘शेवटी मनातील दुःख समोर आलेच. आता या वादाच्या ठिणगीचा कधी भडका उडेल, हे तर येणारा काळच सांगेल. काँग्रेसला सत्तेत आणण्यासाठी सचिन पायलट यांचे महत्वाचे योगदान आहे. निवारण समितीकडून अद्यापही वादाच्या मुद्द्यांचे निराकरण झालेले नाही. हे कधी होईल कुणास ठाऊक,’ यानंतर मात्र सचिन पायलट यांनी भाजपचा डाव ओळखत जोरदार पलटवार केला. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, की ‘भाजपच्या नेत्यांनी फुकटची बडबड करण्यापेक्षा राज्यातील आपल्या परिस्थितीवर गंभीरपणे विचार करावा. गटबाजी आणि अंतर्गत कलह इतका वाढला आहे, की भाजपास विरोधी पक्ष म्हणून काम करणेही कठीण झाले आहे. यांच्या अपयशी धोरणांमुळे देशात निर्माण झालेल्या संकटात जनतेस एकटे सोडणाऱ्यांना जनता रोखठोक उत्तर देईल,’ अशी टीका त्यांनी केली. पायलट यांच्या या प्रत्युत्तराने भाजपचे नेते चांगलेच तोंडघशी पडले आहेत.

Advertisement

दरम्यान, राजस्थानमध्ये सत्ताधारी काँग्रेस पार्टीत सध्या अंतर्गत वाद वाढले आहेत. अशोक गेहलोत मुख्यमंत्री झाल्यापासून वाद वाढण्यास सुरुवात झाली. काँग्रेसच्या या निर्णयावर उपमुख्यमंत्री सचिन पायलट चांगलेच नाराज झाले होते. मध्यंतरी तर वाद इतके वाढले होते, की पायलट काँग्रेस लवकरच सोडणार अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, वरिष्ठ नेत्यांनी हस्तक्षेप केल्यानंतर हा वाद शांत झाला होता. पायलट काँग्रेसमध्येच राहिले, त्यामुळे भाजपचे डाव फसले.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply