Take a fresh look at your lifestyle.

..तर शिवसेनेचे अडसूळ होतील खासदार; राणा यांच्या पदाचे काय होणार याकडे लागले राज्याचे लक्ष

मुंबई : लोकसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्या पाठींब्याने शिवसेनेचे विद्यमान दिग्गज खासदार आनंदराव अडसूळ यांचा युवा स्वाभिमानी पक्षाच्या खासदार नवनीत राणा-कौर यांनी पराभव केला होता. नंतर त्या मोदींवर स्तुतिसुमने उधळीत असल्याने आघाडीपासून दुरावल्या. आता त्याचा राणा यांचे  जात वैधता प्रमाणपत्र अवैध असल्याचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.

Advertisement

अडसूळ यांनी नवनीत यांच्या वैधता प्रमाणपत्राविरोधात २०१९ मध्ये मुंबई हायकोर्टात रिट याचिका दाखल केल्याने यावर सुनावणी झाली आहे. यावर अनुसूचित जातीचे जात वैधता प्रमाणपत्र अवैध असल्याचा निकाल देतानाच दाेन लाख रुपयांचा दंडही न्यायालयाने ठोठावला आहे. या निकालाविरुद्ध सुप्रीम कोर्टात दाद मागणार आहे. आधी सुप्रीम कोर्टाच्या अधीन जात पडताळणी समितीने माझे जात प्रमाणपत्र तीन वेळा पूर्ण छाननी करून वैध असल्याचा अहवाल सादर केल्याकडे राणा यांनी लक्ष वेधले आहे.

Advertisement

प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या उमेदवारास सुप्रीम कोर्टात दाद मागण्याचा अधिकार आहे. भारतीय प्रतिनिधित्व कायदा १९५१ अन्वये जात वैधता प्रमाणपत्र खोटे ठरल्यास हायकोर्ट अशा खासदाराचे संसद सदस्यत्वास स्थगिती देऊ शकते किंवा रद्द करू शकते. दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवणाऱ्या उमेदवारास विजयी म्हणून घोषित करण्याचाही आदेश याप्रकरणी होऊ शकतो. एकूणच सर्वोच्च न्यायालयाचा निकालही राणा यांच्या विरोधात गेल्यास याद्वारे राणा यांचे पद जाण्यासह अडसूळ यांच्या गळ्यात खासदारकीची माळही पडू शकते.

Advertisement

कोर्टाचे निकालपत्र आणि आवश्यक ती सर्व कागदपत्रे केंद्रीय निवडणूक आयोगाला लवकरच सुपूर्द करणार आहोत. आयोग त्यावर सुनावणी घेऊन निर्णय देईल. राणा यांना त्यांच्याकडील कागदपत्रे जमा करण्यास कोर्टाने ६ आठवड्यांची मुदत दिली आहे. पण, आजच्या आदेशाला स्थगिती दिलेली नाही, याकडे अडसूळ यांनी लक्ष वेधले आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply