Take a fresh look at your lifestyle.

होय बाबांनो.. हॉलीवूडपट पाहणे आणि फाटक्या जीन्स घातल्यावर होतेय थेट मृत्युदंडाची शिक्षाच..!

दिल्ली : लोकशाहीमधील काही त्रुटीवर बोट ठेऊन काही शिकलेले महाभागही थेट हुकुमशाही कशी बेस्ट असते याचे गोडवे गात असतात. त्यांनी राजेशाहीचा किंवा हिटलरचा इतिहास किंवा आताच्या हुकुमशाही भागातील गोष्टी ऐकायला पाहिजेत. म्हणजे या हुकुमशाहीची डोक्यातली हवा एकाच झटक्यात उतरेल.

Advertisement

होय, असले प्रकार करून सध्या उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनीच प्रसिद्धी मिळवली आहे. किम जोंग उन यांनी नुकतेच सरकारी माध्यमांना एक पत्र लिहून कळवले आहे की, विदेशी चित्रपट पाहणे आणि विदेशी कपडे घातल्यास किंवा एखाद्याजवळ अमेरिकी, जपानी किंवा दक्षिण कोरियाचे व्हिडिओ आढळले तर त्यालाही मृत्युदंड दिला जाईल.

Advertisement

विदेशी भाषणे, हेअरस्टाइल आणि कपड्यांना धोकादायक विष समजणारे किम यांनी तरुणांमधील अप्रिय, व्यक्तिवादी, समाजविरोधी वर्तनाविरोधात मोहीम राबवण्याचे आवाहन केलेले आहे. कर्मचारी दोषी आढळल्यास कारखाना प्रमुखाला शिक्षा होईल. मुलाने विदेशी कपडे घातले किंवा विदेशी हेअरस्टाइल केली तर त्याच्या आई-वडिलांना शिक्षा केली जाईल, असेही फर्मान किम यांनी काढलेले आहे. तरुणांमध्ये भीती निर्माण करून त्यांच्या इच्छा मारण्याचे हे सरकारी अभियान आहे. बाहेरील जगाशी संबंध आल्यास देशभरातून विरोध होण्याच्या शक्यतेने किम यांनी असले डाव रचलेले आहेत.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply