Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ कामात झालाय हजारो कोटींचा महाघोटाळा; पहा नेमकी काय टीका केलीय भाजपने

मुंबई : देशात मान्सूनचे आगमन झाल्यानंतर अनेक राज्यात पाऊस सुरू झाला आहे. राज्यातही अनेक ठिकाणी पाऊस होत आहे. तसे आता पावसाच्या मुद्द्यावर सुद्धा राजकारण सुरू झाले आहे. पहिल्याच पावसात मुंबई शहर आणि उपनगरात पावसाचे पाणी साचले आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेही पावसाळ्यात मुंबईत ही समस्या नेहमीचीच आहे. या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधकात आरोप-प्रत्यारोप सुद्धा नवीन नाहीत.

Advertisement

आता भाजपने या मुद्द्यावर मुंबई मनपाच्या कारभारावर जोरदार टीका केली आहे. भाजप आमदार आशिष शेलार यांनी ट्विट केले आहे. त्यांनी म्हटले आहे, की ‘मुंबईत दरवर्षी प्रमाणे पाणी तुंबलेय, घरात पाणी घुसत आहे. नालेसफाई कधी १०७ टक्के, कधी १०४ टक्के, दाव्यांचे आकडे मोठे-मोठ्याने “वाझे”. पहिल्या पावसातच कटकमिशनचे सर्व व्यवहार उघडे ! मुंबईकर हो, सत्ताधीशांचा हा वसुलीचा नाद खुळा नेमेची येतो पावसाळा… पाच वर्षात एक हजार कोटींचा घोटाळा !!

Advertisement

मुंबई परिसरात कालपासूनच पाऊस होत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने काही रेल्वे बंद आहेत. मुंबईत नालेसफाईचा दावा केला जात असला तरी तो फोल ठरला आहे. त्यामुळे भाजपने पालिकेच्या या कारभारावर टीका केली आहे. पहिल्याच पावसात शहरात पाणी साचले. नालेसफाईचा दावा सुद्धा फोल ठरला आहे. प्रशासनाने लक्ष न दिल्याने कंत्राटदारांनी पळ काढला आहे.

Advertisement

मुंबईत दरवर्षी नालेसफाईच्या कामासाठी साधारण ७० ते १०० कोटी रुपये दिले जातात. पाच वर्षांचा विचार केला तर ही रक्कम ५०० कोटींच्या घरात जाते. आणि या व्यतिरिक्त छोटे नालेसफाई तसेच पाणी साचणार नाही यासाठी आवश्यक उपाययोजनांसाठी ५०० कोटी रुपये खर्च केले जातात. म्हणजेच, या कामांसाठी पाच वर्षात तब्बल एक हजार कोटी रुपये खर्च केले जातात. तरी सुद्धा शहरात पाणी साचतच आहे, असे त्यांनी सांगितले.

Advertisement

तसे पाहिले तर पावसाच्या दिवसात मुंबईतील रस्त्यात कायमच पाणी साचते. रेल्वे सुद्धा बंद असतात. पावसाळ्या पूर्वी नालेसफाईचा दावा केला जातो. प्रत्यक्षात मात्र ही समस्या आजही कायम आहे. आताही पावसास सुरुवात झाली आहे. पहिल्याच पावसात शहरात दाणादाण उडाली आहे. पुढील काही दिवसात शहरात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply