Take a fresh look at your lifestyle.

हमीभावात घसघशीत वाढ..! मोदी सरकारचे गिप्ट, पाहा कोणत्या शेतमालासाठी किती पैसे वाढविले..?

नवी दिल्ली : खरीप हंगाम तोंडावर असताना, मोदी सरकारने (Modi sarkar) शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे यंदाही सरकारने शेतमालाच्या हमीभावात घसघशीत वाढ केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक बाबींवरील मंत्रिमंडळाच्या समितीने 2021-22 च्या सर्व हंगामातील खरेदीसाठी खरीप पिकासाठी किमान आधारभूत किंमती (एमएसपी) आज जाहीर केल्या.

Advertisement

शेतकरी, उत्पादकांना त्यांच्या घामाचे दाम मिळावे, यासाठी सरकारने खरीप पिकांचा ‘एमएसपी’ (किमान आधारभूत किंमत) वाढवली आहे. मागील वर्षांच्या तुलनेत ‘एमएसपी’मध्ये यंदा सर्वाधिक वाढीची शिफारस तिळासाठी (452 रुपये प्रति क्विंटल) करण्यात आली आहे. तसेच, तूर आणि उडदाच्या भावातही 300 रुपये प्रति क्विंटलमागे वाढ करण्यात आली आहे.

Advertisement

भूईमूग किंवा शेंगदाणा. नाचणीबाबतीत अनुक्रमे 275 आणि 235 रुपयांची वाढ केली आहे. वेगवेगळ्या पिकांसाठी वेगवेगळी ‘एमएसपी’ (MSP) सरकारने जाहीर केली आहे.

Advertisement

सरकारने जाहीर केलेला हमीभाव (प्रति क्विंटल)

Advertisement

पीक………… …  .. 2020-21…… 2021-22…….वाढ
भात………………    .. 1868…….. 1940………… 72
भात (ग्रेड-अ)……..   1888………1960…………. 72
ज्वारी (संकरीत)…. 2620……… 2738………… 118
ज्वारी (मालदांडी).. 2640……… 2758………….118
बाजरी…………….. 2150……….2250………….100
नाचणी……………. 3295……… 3377 …………. 82
मका………………..1850……….1870………….. 20
तूर………………… 6000 ……… 6300 ……….. 300
मूग……………….. 7196………..7275 ………….79
उडीद……………….6000 ………..6300………….300

Advertisement

शेतकर्‍यांना वाजवी मानधन मिळावे या उद्देशाने एएमसपीमध्ये वाढ करण्यात आलीय. उत्पादन खर्चाच्या तुलनेत शेतकऱ्यांना अपेक्षित सर्वाधिक परतावा बाजरी (85%), उडीद (65%) आणि तूर (62%) या पिकांवर अंदाज आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply