Take a fresh look at your lifestyle.

चीनसह जगाच्या डोकेदुखीतही वाढ; अमेरिकेचा अहवाल आल्याने त्यावर शिजणार राजकीय डाव..!

वॉशिंग्टन : कोरोना विषाणूच्या जन्माचा वाद अजूनही मिटलेला नाही. नुसते अहवालांवर अहवाल येत आहेत. मात्र, ठोस उत्तर काही मिळत नाही. तसे म्हटले तर, बऱ्याचशा अहवालांनी चीनलाच टार्गेट केले आहे. इतकेच कशाला, काही वैज्ञानिकांनी तर कोरोना वुहान लॅबद्वारेच जगात पसरला, याचे अगदी भक्कम पुरावे मिळाल्याचाही दावा केला आहे. आता तर या सगळ्या प्रकरणावर खुद्द अमेरिकेचाच रिपोर्ट आला आहे. या रिपोर्टमध्ये चीनवरच आरोप केले आहेत. अमेरिकेने आपल्या या अहवालात म्हटले आहे, की कोरोना विषाणू वुहानच्या प्रयोगशाळेतूनच लीक झाला असावा, याची जास्त शक्यता आहे.

Advertisement

वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालानुसार, कोरोना विषाणू वुहानमधील एका प्रयोगशाळेतूनच लीक झाला असावा, असे घडू शकते. त्यामुळे याबाबत आधिक तपासणी करण्याची गरज आहे, असा दावा अमेरिकेच्या सरकारी प्रयोगशाळेने केला आहे. कॅलिफोर्नियाच्या लॉरेन्स लिवरमोर सरकारी प्रयोगशाळेने मे २०२० मध्ये कोरोना विषाणूच्या उत्पत्तीबाबत अध्ययन केले होते. प्रयोगशाळेचे अध्ययन कोविड-१९ विषाणूच्या जीनोमिक विश्लेषणावर आधारीत आहे. या अहवालानंतर आता अमेरिकेचा दावा आणखी मजबूत झाला आहे. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा मार्गदर्शक जैक सुलिवन यांनीही सांगितले, की कोरोना विषाणूच्या उत्पत्तीबाबत माहिती देण्यासाठी अमेरिका चीनवर दबाव टाकत राहणार आहे. अमेरिकेचे विदेश मंत्री टोनी ब्लिंकन यांनी सांगितले, की एकतर हा विषाणू प्रयोगशाळेतून लीक झाला असावा किंवा नैसर्गिक पद्धतीने तयार झाला असावा. मात्र, ते काहीही असले तरी याचे उत्तर शोधण्याचे आदेश अध्यक्ष जो बायडेन यांनी दिले आहेत.

Advertisement

दरम्यान, अमेरिका अशा पद्धतीने चीन विरोधात रणनिती तयार करत असताना चीनने मात्र आपल्यावरील सर्व आरोप नाकारले आहेत. चीनने उलट अमेरिकेवरच आरोप केले आहेत. कोरोनाबाबत चीनने अजूनही बरीचशी माहिती जगाला दिलेली नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या पथकाने ज्यावेळी चीनचा दौरा केला होता, त्यावेळी सुद्धा चीनने त्यांना सर्व माहिती दिली नव्हती. तसेच कोरोना संदर्भात आतापर्यंत जे काही अहवाल आले आहेत, त्याद्वारे सुद्धा कोरोना विषाणू वुहान प्रयोगशाळेतूनच लीक झाल्याचा दावा केला आहे. त्यामुळेच चीनवरील संशय आधिकच बळावला आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तर थेट चीनवर आरोप करत कोरोना विषाणूमुळे जगात जो काही विध्वंस झाला आहे, लाखो लोकांचे मृत्यू झाले आहेत, त्याची भरपाई म्हणून दहा ट्रिलियन डॉलर द्यावेत, अशी मागणी केली आहे. चीनन मात्र सर्व आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply