Take a fresh look at your lifestyle.

लसटंचाईला मूठमाती देण्यासाठी मोदी सरकार सरसावले; पहा नेमकी काय केलीय ठोस कार्यवाही

दिल्ली : केंद्र सरकारने सर्व नागरिकांच्या मोफत लसीकरणाचा निर्णय घेतला आहे. येत्या २१ जूनपासून या मोहिमेस सुरुवात करण्यात येणार आहे. त्यामुळे नियोजनास सुरुवात करण्यात आली आहे. लसीकरणाच्या नवीन गाइडलाइन्स जारी केल्या आहेत. आरोग्य मंत्रालयाने लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना ७४ कोटी लसींची ऑर्डर सुद्धा दिली आहे. सरकारने ३० टक्के रक्कम कंपन्यांना आगाऊ दिली आहे, अशी माहिती निती आयोगाचे सदस्य डॉ. वी. के. पॉल यांनी दिली.

Advertisement

केंद्र सरकार ज्या लसी खरेदी करणार आहे, त्यामध्ये २५ कोटी कोविशील्ड, १९ कोटी कोवैक्सिन आणि ‘बायोलॉजिकल इ लिमिटेड’ च्या ३० कोटी लसींचा समावेश आहे. ‘बायोलॉजिकल इ’ कंपनीची लस सप्टेंबर पर्यंत मिळण्याची शक्यता आहे. या ३० कोटी लसींसाठी सुद्धा ऑर्डर दिली आहे. खासगी दवाखान्यांसाठी लसींची किंमत लस कंपन्या निश्चित करणार आहेत. या पद्धतीने लसीकरणाचे नियोजन करण्यात येत आहे.

Advertisement

कंपन्यांकडून या लसी मिळाल्यानंतर राज्यांना मोफत उपलब्ध दिल्या जाणार आहेत. यासाठी राज्यांची लोकसंख्या, कोरोना संक्रमितांची संख्या यांसारखे काही घटक विचारात घेतले जाणार आहेत. राज्यांना लसींसाठी कोणताही खर्च  करावा लागणार नाही. राज्यांनी फक्त लसीकरणाचे नियोजन करायचे आहे. लसीकरणासाठी प्राधान्य क्रम निश्चित करण्याचे अधिकार सुद्धा राज्यांना दिले आहेत. लसीकरणाची जवळपास सर्वच जबाबदारी केंद्राने घेतली आहे. त्यामुळे आता कोणत्याही परिस्थितीत लसींची कमतरता होणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे.

Advertisement

याआधी लसींची कमतरता असल्याने अनेक ठिकाणी लसीकरण बंद करावे लागत होते. आजही काही राज्यांत लसी नसल्याने लसीकरण बंद आहे. राज्यांकडूनही तक्रारी केल्या जात आहेत. त्यामुळे देशात लसीकरण खूपच धिम्या गतीने होत आहे. देशात २३ कोटींपेक्षा जास्त लोकांचे लसीकरण झाले आहे. देशाच्या लोकसंख्येचा विचार केला तर लसीकरणाचे प्रमाण अजूनही कमी आहे. त्यामुळे आता कोणत्याही परिस्थितीत लसीकरणाचा वेग वाढणे गरजेचे आहे. आता केंद्रानेच लसीकरणाची जबाबदारी घेतली आहे. तसेच ७४ कोटी लसींची ऑर्डर सुद्धा दिली आहे. या व्यतिरिक्त अन्य आवश्यक नियोजनही करण्यात येत आहे. त्यामुळे निदान यावेळी तरी लसींची कमतरता होणार नाही, आणि देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण वेगात होईल, असे अपेक्षित आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply