Take a fresh look at your lifestyle.

लसीकरणाला गती देण्यासाठी स्थानिक प्रशासनाने व्यापाऱ्यांना केलेय ‘असे’ आवाहन; पहा काय होणार फायदा

भुवनेश्वर : कोरोनाच्या संकटावर मात करायची असेल तर लसीकरणाशिवाय पर्याय नाही, हे आता सर्वांच्याच लक्षात आले आहे. त्यामुळे काहीही करुन लवकरात लवकर लसीकरण झालेच पाहिजे यासाठी सगळेच देश आटापिटा करत आहेत. काही देशांनी तर शंभर टक्के लसीकरण करुन कोरोनामुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. मात्र, जगात असेही काही देश आहेत, की ज्यांना कोरोना लस माहित सुद्धा नाही. तर दुसरीकडे काही देशांनी लसीकरण सुरू केले असले तरी लसीकरणाचा वेग खूपच कमी आहे. लोकांच्या मनात शंका असल्यानेही लोक लस घेण्यास टाळाटाळ करतात, असेही प्रकार घडतात. तर काही ठिकाणी लोकांनी लसीकरण करावे, यासाठी भन्नाट आयडीया वापरल्या जात आहेत.

Advertisement

लसीकरणासाठी नागरिकांना प्रोत्साहन मिळावे आणि लसीकरणाबाबत लोकांच्या मनातील शंका दूर करण्यासाठी ओदिशा राज्यातील गंजम जिल्ह्यातील नगर पालिकेने व्यापाऱ्यांना एक अनोखे आवाहन केले आहे. कोरोना प्रतिबंधक लसींचे दोन्ही डोस घेतलेले ग्राहक जर खरेदी करण्यासाठी दुकानात आले तर त्यांना खरेदीत पाच टक्के सवलत द्यावी, असे आवाहन पालिकेने दुकानदारांना केले आहे. याबाबत आधिक माहिती देताना हिंजली म्युन्सिपल काउंसिलचे अधिकारी मनोरंजन साहू यांनी सांगितले, की व्यापाऱ्यांना आवाहन केले आहे. व्यापाऱ्यांनी सुद्धा या आवाहनास प्रतिसाद दिला असून काही व्यापाऱ्यांनी सवलत देण्यास सुरुवात केली आहे. लसीकरणाबाबत लोकांच्या मनात अजूनही शंका आहेत. या शंका दूर करण्याची गरज आहे. या मोहिमेच्या माध्यमातून लसीकरणास आधिक प्रोत्साहन मिळेल, असे त्यांनी सांगितले.

Advertisement

दरम्यान, आता देशातील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण केंद्र सरकार करणार आहे. राज्यांना कोरोना प्रतिबंधक लस मोफत उपलब्ध होणार आहे. राज्यांना फक्त  राज्यातील नागरिकांचा प्राधान्यक्रम ठरवून त्याप्रमाणे लसीकरण करायचे आहे. केंद्र सरकारने राज्यांची लसींची मोठी अडचण दूर केली आहे. केंद्राकडून लसी मिळत नाहीत. राज्यांना लस खरेदीस परवानगी द्या, अशा तक्रारी आता बंद होणार आहेत. या मोहिमेस २१ जूनपासून सुरुवात होणार असल्याने केंद्र सरकारने नियोजन सुरू केले आहे. पहिल्या टप्प्यात लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना ४४ कोटी लसींची ऑर्डर दिली आहे. या लसी मिळाल्यानंतर राज्यांची लोकसंख्या, कोरोना संक्रमितांची संख्या या काही घटकांचा विचार करुन राज्यांना लस उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, अशा पद्धतीने नियोजन करण्यात येत आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply