Take a fresh look at your lifestyle.

अबब.. बंपर लॉटरीच की.. फ़क़्त महिन्यात १० हजार ८८६ बेरोजगारांना आलेत अच्छे दिन..!

मुंबई : कोरोनाच्या संकटाच्या काळात लॉकडाऊनमुळे लाखो लोकांना रोजगार गमवावा लागला. उद्योग-व्यवसाय बंद पडले. कंपन्यानी कोणताही विचार न करता कर्मचारी कपात केली. परिणामी बेरोजगारी वाढली. या बेरोजगारीचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. सरकारलाही या समस्येची जाणीव आहे. म्हणून तर या समस्येवर मात करुन रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे.

Advertisement

या प्रयत्नांना काही प्रमाणात यश येतानाही दिसत आहे. कारण, कोरोनाच्या संकटात रोजगार गमावलेल्या १० हजार ८८६ बेरोजगारांना राज्य सरकारच्या कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता विभागाच्या माध्यमातून रोजगार मिळवून दिल्याचा दावा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, मे महिन्यात इतक्या मोठ्या संख्येने बेरोजगारांना रोजगार देण्यात आला आहे. या विभागाच्या माध्यमातून रोजगार मेळावे घेतले जातात. यामध्ये नाव नोंदणी करणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती सहभागी कंपन्यांकडून घेतल्या जातात. त्यानंतर उमेदवारांची निवड करुन त्यांना नियुक्त केले जाते. कोरोना संकटात अनेक जणांचे रोजगार गेले. त्यामुळे रोजगारासाठी नोंदणी करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यानुसार विभागाकडून नियोजन करण्यात येत आहे. मागील २०२० वर्षाचा विचार केला तर या एका वर्षात राज्यातील तब्बल १ लाख ९९ हजार ४८६ उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आला आहे. या वर्षात जानेवारी ते मे २०२१ पाच महिन्यांच्या काळात ६३ हजार ५५ जणांना रोजगार मिळवून दिला आहे, असे राज्याचे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.

Advertisement

दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन केला होता. या लॉकडाऊनमुळे राज्यातील लाखो लोकांना रोजगार गमवावे लागले. उद्योग-व्यवसाय बंद पडले. राज्याचा महसूल घटला. पहिल्या लाटेवेळी सुद्धा अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. या संकटाने देशात बेरोजगारीत चांगलीच वाढ झाली आहे. काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात केली आहे. त्यामुळे आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. देशातील जवळपास ९७ टक्के कुटुंबांचे उत्पन्न घटले आहे. कोरोनाचे संकट अजूनही कायम आहे. त्यामुळे कंपन्यांनी कर्मचारी भरतीचा विचार केलेला नाही. काही कंपन्या भरती करत आहेत. मात्र, त्यांचे प्रमाण खूपच कमी आहे. बेरोजगारीची समस्या कमी करुन जास्तीत जास्त रोजगार निर्माण करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांना आणखी ठोस प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply