Take a fresh look at your lifestyle.

बाप रे..! सिंहानंतर आता हत्तीही कोरोनाच्या विळख्यात, पाहा नेमकं कुठे आलेय समोर..?

नवी दिल्ली – काही दिवसांपूर्वी हैदराबादेतील नेहरू जूलॉजिकल पार्कमधील 8 आशियाई सिंहांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. चेन्नईजवळील वंडलूर अरिग्नार अण्णा प्राणिसंग्रहालयातील (Arignar Anna Zoological Park) एका सिंहिणीचा अचानक मृत्यू झाला. कोरोनामुळेच तिचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यानंतर आता सिंहापाठोपाठ हत्तींही कोरोनाच्या विळख्यात सापडल्याचे समोर येत आहे.

Advertisement

तमिळनाडूच्या मदुमलाई टायगर रिझर्व्हमधील (Mudumalai Tiger Reserve) हत्तींना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. येथील तब्बल 28 हत्तींची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशच्या इंडियन वेटरिनरी रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये या हत्तींचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत. हे सर्व हत्ती 2 ते 60 वर्षे वयोगटातील आहेत. अजून त्यांचे अहवाल आलेले नव्हते. हत्तींची कोरोना चाचणी करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

Advertisement

चेन्नईजवळच्या प्राणिसंग्रहालयातील 9 वर्षांच्या ‘निला’ नावाच्या सिंहिणीचा 3 जून रोजी मृत्यू झाला. प्राणिसंग्रहालयातील 11 पैकी 9 सिंहांचा कोरोना चाचणी रिपोर्ट ‘पॉझिटिव्ह’ आला आहे. त्यांच्या रिपोर्टची पडताळणी करण्यासाठी भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्था (बरेली) आणि सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी (हैदराबाद) येथे पाठविले आहेत. सध्या सर्व सिंहांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे.

Advertisement

उत्तर प्रदेशच्या इटावामधील लायन सफारी पार्कमधील (Etawah Safari Park) दोन सिंहिणी पॉझिटिव्ह आल्या होत्या. त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले होते. गौरी आणि जेनिफर असं या सिंहिणींचं नाव असून त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर उपचार सुरू होते.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply