Take a fresh look at your lifestyle.

‘ही’ बँक देतेय स्वस्तात कर्ज.. मग पाहताय काय, करा की अर्ज..! पहा किती व्याजदर आहे..?

नवी दिल्ली : आयुष्यात प्रत्येकाचे एक स्वप्न असतेच, ते म्हणजे ‘फिरायला गाडी नि राहायला माडी’.. आता हे स्वप्न साकार करायचे, तर खिसा भरलेला लागतो. मग अशा वेळी मदतीला येतात बँका.. पण बँकाकडून कर्ज घेतानाही काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असते.. नाहीतर नाकापेक्षा मोतीच जड होण्याची शक्यता असते. कर्जाचे हप्ते भरता भरता जीव मेटाकुटीला येतो. तर एका बँकेने आपण स्वस्तात मस्त कर्ज देण्यास तयार असल्याचे जाहीर केले आहे. कोणती बँक आहे ही, किती व्याजदराने कर्ज देते, त्याचा आपल्याला कसा फायदा होऊ शकेल, याबाबत जाणून घेऊ या..

Advertisement

.. तर कॅनरा बँकेने (Canara bank) सर्वात स्वस्त कर्ज देत असल्याचा दावा केला आहे. सर्वात कमी व्याजदराने कर्ज देत असल्याची घोषणा बँकेने ट्विटवरून केली आहे. बँकेच्या माहितीनुसार, 7.35 टक्के एमसीएलआर (MCLR) आणि 6.90 टक्के आरएलएलआर (RLLR) दराने कर्ज दिलं जात आहे. अर्थात बँकेच्या काही अटी-शर्ती आहेत. त्याचं पालन केल्यानंतरच कर्ज दिलं जाईल.

Advertisement

घर किंवा वाहनासाठी कॅनरा बँकेचे कर्ज घेण्यासाठी बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अप्लाय करू शकता. तसंच बँकेच्या https://canarabankcsis.in/canaraila/newmain.aspx ही लिंकवर ‘लोन सेक्शन’वर क्लिक करा. तुम्हाला कशासाठी कर्ज घ्यायचं आहे, त्यावर क्लिक करून अप्लाय करू शकता. त्यानंतर बँकेचे कर्मचारी तुमच्याशी संपर्क साधतील. या लिंकच्या माध्यमातून तुम्ही लोनच्या ‘इएमआय’बद्दल माहिती मिळवू शकता.

Advertisement

एमसीएलआर (MCLR) कमी-जास्त केल्याचा परिणाम हा नवं कर्ज घेणाऱ्यांसोबतच, 2016 नंतर ज्यांनी कर्ज घेतलं होतं, अशा सगळ्यांवरच होतो. एप्रिल-2016 पूर्वी रिझर्व्ह बँकेकडून कर्ज देण्यासाठी किमान व्याजदर ठरवून दिले जात असत, त्यांना बेस रेट म्हणत. या दरापेक्षा कमी दराने कर्ज देण्याची बँकांना परवानगी नव्हती.

Advertisement

1 एप्रिल 2016 नंतर ‘एमसीएलआर’ लागू करण्यात आला. कर्जासाठी ‘मिनिमम रेट’ नक्की करण्यात आला. त्यानंतर पुढे ‘एमसीएलआर’च्या आधारावरच कर्ज देण्यास सुरुवात झाली.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply