Take a fresh look at your lifestyle.

मोदी-ठाकरे भेटीद्वारे होईल ‘ते’ही साटेलोटे; महाराष्ट्र भाजप पेचात, पहा नेमकी काय झालीय अर्ध्या तासात चर्चा

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र राज्याच्या शिष्टमंडळास १५-२० मिनिटात कटवतील आणि शिवसेनेला त्यांची ‘जागा’ दाखवतील असाच कयास महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांचा होता. मात्र, घडले अगदीच त्याच्या उलट. मोदींनी शिष्टमंडळाला भरपूर वेळ देण्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या एकट्याशी चर्चा करायला वाढीव अर्धा तास दिला. त्यामुळे महाराष्ट्र भाजपच पेचात अडकला आहे. तर, त्या अर्ध्या तासात मोदी-ठाकरे यांनी काही मुद्द्यांवर साटेलोटे केल्याच्या बातम्याही येत आहेत.

Advertisement

मंगळवारी शिष्टमंडळाव्यतिरिक्त ३० मिनिटे बंदद्वार चर्चा शिवसैनिकांना बुस्टर डोस देणारी ठरली आहे. यानिमित्ताने अनेक शिवसैनिकांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना हा झटका असल्याचा दावा केला आहे. शिवसेनेसाठी अत्यंत कळीचा ठरलेला कांजूरमार्ग मेट्रोशेड प्रकल्प आणि मोदींचा महत्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्प यास एकमेकांना मदतीच्या मार्गाला या अर्ध्या तासाच्या बैठकीतून हवा मिळाली असल्याचे म्हटले जात आहे.

Advertisement

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्या शिष्टमंडळाने तासाभराच्या भेटीत राज्याच्या १२ प्रश्नांची सोडवणूक करण्याची मागणी मोदींना केली. मेट्रो कारशेड प्रकल्प केंद्राने अडवल्याने उद्धव यांनी मोदी यांचा बुलेट ट्रेन प्रकल्प रोखला आहे. त्यावर यातून तोडगा निघाण्यासह राज्यात नव्या राजकीय समीकरणांचा उदय होईल, असेही अंदाज लढवले जात आहेत.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply