Take a fresh look at your lifestyle.

चीनच्या अडचणीत वाढ; अमेरिकेसह ‘त्या’ संस्थेलाही वाटत आहे करोना उगमाच्याबाबत ‘तसला’ संशय

जिनेव्हा : कोरोना विषाणूच्या जन्मावरुन अमेरिका आणि चीनमधील वाद आता आधिकच चिघळत चालला आहे. या वादामुळे जगात आता दोन गट पडले आहेत. कोरोना नेमका आला कुठून, याचे उत्तर शोधायचेच असे अमेरिकेने पक्के ठरवले आहे. तर, दुसरीकडे कावेबाज चीन सुद्धा रणनिती तयार करण्यात गुंतला आहे. कोरोना विषाणूबाबत पुन्हा तपास होऊ नये, असेच चीनचे धोरण आहे. आणि जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा चीनला फायदा होईल, असेच वक्तव्य करण्यास सुरुवात केली आहे. सहाजिकच, यामुळे अमेरिकेचा संताप होणार आहेच. त्यामुळे भविष्यात हा वाद आणखीनच वाढत जाणार, हे मात्र नक्की.

Advertisement

जागतिक आरोग्य संघटनेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या प्रकरणावर असे काही सांगितले आहे, की ज्यामुळे वाद वाढणार आहे. या अधिकाऱ्याने असे म्हटले होते, की ‘कोरोना विषाणूच्या स्त्रोताबाबत आधिक माहिती आणि आकडेवारी देण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना चीनला भाग पाडू शकत नाही.’ आरोग्य संघटनेचे आपत्कालीन कार्यक्रम निदेशन माइक रेयान यांना पत्रकार परिषदेत एक प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना त्यांनी असे म्हटले होते, की ‘काही माहिती देण्यासाठी कोणालाही भाग पाडण्या इतपत अधिकार आरोग्य संघटनेला नाहीत. मात्र, सर्व सदस्य देशांकडून मदत आणि सहयोग अपेक्षित आहे.’

Advertisement

दरम्यान, कोरोनाच्या उत्पत्तीबाबत जगभरात दोन दावे केले जात आहेत. पहिला म्हणजे, हा विषाणू कोणत्या प्राण्याद्वारे विशेषतः वटवाघळांद्वारे माणसांत फैलावल्याचे सांगितले जाते. मात्र, जगातील बहुतांश देश या दाव्यावर विश्वास ठेवण्यास तयार नाहीत. दुसरा दावा असा आहे, की हा विषाणू चीनमधील वुहान येथील प्रयोगशाळेतून लीक झाला. या दाव्यास सिद्ध करणारे काही अहवाल प्रसिद्ध झाले होते. तसेच वैज्ञानिकांना काही पुरावे सुद्धा मिळाले आहेत. तसेच याआधी आरोग्य संघटनेचे पथक सुद्धा तपासणीसाठी चीनमध्ये गेले होते. त्यावेळी चीनने सर्व आकडेवारी दिली नाही, असे या पथकातील सदस्यांनी सांगितले होते. त्यामुळेच चीनवरील संशय वाढला आहे. या मुद्द्यावर चीन सुरुवातीपासूनच जगाची दिशाभूल करत आला आहे. सुरुवातीला या विषाणूची माहिती चीनने उशीरा जगाला दिली. त्यामुळे जगभरात या विषाणूने अक्षरशः थैमान घातले. आता तपासणी करण्यासही टाळाटाळ करत आहे. काहीतरी कारणे सांगून या मुद्द्यापासून पळ काढण्याचा त्याचा प्रयत्न आहे. आता या घडामोडींवर अमेरिका काय प्रतिक्रिया देणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply