Take a fresh look at your lifestyle.

तर ‘त्या’ सवलती ठरू शकतात घातक; पहा नेमके काय म्हटलेय आरोग्य संघटनेने

जिनेव्हा : जगात अनेक ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला, आणि लगेच लॉकडाऊनमध्ये सवलती देण्यास सुरुवात झाली आहे. कोरोना कमी झाला म्हणजे तो अजूनही आहेच. त्याचा संसर्ग पुन्हा वाढण्याचाही धोका आहेच. अशा वेळी निर्बंधांत सवलती देताना खूप काळजी घ्यावी लागणार आहे, अन्यथा या सवलतीच जास्त घातक ठरू शकतात, असा गंभीर इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.

Advertisement

जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी लॉकडाऊन उपयुक्त ठरले आहे. त्यामुळे रुग्ण कमी झाले आहेत. त्यानंतर अनेक देशांनी लॉकडाऊन शिथील करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, कोरोनाचा धोका अजून कायम आहे. डेल्टासह आणखी काही व्हेरिएंट वेगाने फैलावत आहेत. अशा परिस्थितीत निर्बंधात सवलती देताना होत असलेली घाई अत्यंत घातक आणि विनाशकारी ठरू शकते, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉ. टेड्रोस एडेनहोम घेब्रेसियस यांनी दिला आहे. ब्रिटनमध्ये कोरोना नियंत्रणात आला होता. आता मात्र येथे पुन्हा रुग्ण वाढत आहेत. डेल्टा व्हेरिएंटमुळे येथे संसर्ग वाढत असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे, ब्रिटनने १७ मे पासूनच अनलॉक करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर मात्र रुग्ण वाढू लागले आहेत. या व्यतिरिक्त स्वीडन, लेक्झेंबर्ग, रशिया या देशांतही कोरोनाचा संसर्ग वाढत आहे.

Advertisement

दरम्यान, आता भारतातही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर कमी झाला आहे. रुग्णसंख्या वेगाने कमी होत आहे. पॉझिटिव्हिटी रेट सुद्ध कमी झाला आहे. त्यामुळे देशातील राज्ये लॉकडाऊनच्या निर्बंधात ढील देत आहेत. निर्बंधात सवलती मिळाल्याने लोकांनी पुन्हा गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी, सार्वजनिक ठिकाणी गर्दी असे चित्र दिसत आहे. यामुळे कोरोना संसर्गाचा धोका पुन्हा वाढला आहे. कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करणे खूप गरजेचे आहे. दुसऱ्या लाटेत किती विध्वंस झाला, हे सगळ्यांनीच पाहिले आहे. निदान पुन्हा अशी  परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी राज्य व केंद्र सरकार वारंवार सूचना देत आहेत. इशाराही दिला जात आहे. त्यामुळे नागरिकांनी सुद्धा आपली जबाबदारी ओळखून नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply