Take a fresh look at your lifestyle.

म्हणून अखेर व्याघ्र प्रकल्पामध्येही सुरू झालाय लॉकडाऊनचा खेळ..!

दिल्ली : कोरोना विषाणूने जगभरात उच्छाद मांडला आहे. हा घातक विषाणू आता प्राण्यांना सुद्धा संक्रमित करत आहे. काही दिवसांपूर्वी तामिळनाडू राज्यातील एका अभयारण्यात ९ सिंह कोरोना बाधित आढळले होते. यातील एका सिंहीणीचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. या घटनेनंतर आता काही निर्णय घेण्यात येत आहेत. ‘नॅशनल टाइगर कंजरवेशन अॅथॉरिटी’ ने (एनटीसीए) देशातील सर्व वाघ अभयारण्य बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. माणसांद्वारे प्राण्यांमध्ये संक्रमण होण्याचा धोका असल्याने हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Advertisement

प्राण्यांत कोरोना संसर्गाच्या तशा फारशा घटना नाहीत. मात्र, प्राण्यांना हा विषाणू संक्रमित करू शकतो हे सध्या घडत असलेल्या काही घटनांवरुन सिद्ध झाले आहे. भारतात तामिळनाडूतील एका अभयारण्यात ९ सिंह कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. देशातील ही बहुधा पहिलीच घटना होती. त्यामुळे देशात खळबळ उडाली. या सिंहांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर तत्काळ उपचार सुरू करण्यात आले होते. मात्र, यातील एक सिंहीणीचा मृत्यू झाला. या घटनेचे गांभीर्य ओळखून प्राण्यांसंदर्भात काही महत्वाचे निर्णय घेतले गेले आहेत. एनटीसीएने देशातील सर्व वाघ अभयारण्यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात तामिळनाडूतील घटनेचा उल्लेख केला आहे. त्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत सर्व अभयारण्ये बंद ठेवावीत तसेच पर्यटन सुद्धा बंद ठेवावे, असे आदेश दिले आहेत.

Advertisement

याआधी हैदराबाद येथील नेहरू जूलॉजिकल पार्कमध्ये आठ सिंह कोरोना बाधित आढळले होते. त्यानंतर जयपूर येथेही दोन सिंह आणि एक वाघ कोरोना बाधित आढळले होते. उत्तर प्रदेश राज्यातील इटावा येथे सुद्धा दोन सिंहीणी कोरोना बाधित असल्याचे दिसून आले होते. देशात प्राण्यांमध्ये कोरोना संक्रमणाच्या अशा काही घटना घडल्या आहेत. माणसांद्वारे प्राण्यांमध्ये कोरोना फैलावण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पार्क, अभयारण्यात निर्बंध कठोर केले जात आहेत. अभयारण्य बंद करण्याचा निर्णय त्यासाठीच घेण्यात आला आहे.

Advertisement

दरम्यान, प्राण्यांमध्ये कोरोना संक्रमणाची पहिली घटना स्पेन येथील बार्सिलोना आणि अमेरिकेतील प्राणी संग्रहालयात घडली होती. येथील काही सिंह आणि वाघ कोरोना बाधित आढळले होते. त्यानंतर जगात आणखी काही ठिकाणी अशा घटना समोर आल्या होत्या. पाळीव प्राण्यांमध्ये सुद्धा कोरोनाचे संक्रमण आढळले होते.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply