Take a fresh look at your lifestyle.

सोयाबीन : बियाणेटंचाई जोमात, शेतकरी कोमात; पहा महाबीजकडून काय आलेय उत्तर

अहमदनगर / नाशिक : यंदा प्रथमच सोयाबीन या शेतमालास तब्बल 8 हजारांच्या पल्याड बाजारभाव मिळाला. आताही तेलाचे भाव चढे असल्याने वर्षभर सोयाबीनला चांगला भाव राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्याचवेळी या महत्वाच्या पिकाच्या बियाण्याचा तुटवडा महाराष्ट्रात जाणवत आहे. महाबीज या सरकारी कंपनीनेही यंदा फ़क़्त ५० बियाणे पुरवठा होणार असल्याचे सांगून हात झटकले आहेत. परिणामी यंदा शेतकऱ्यांची फसवणूक जोरात होण्याची शक्यता आहे.

Advertisement

महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागाच्या वतीने यंदा अशी समस्या निर्णन होण्याच्या शक्यता लक्षात घेऊन काही कार्यवाही करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्यातून ठोस असे काहीही हाती आलेले नाही. त्यातच इतर राज्यांनी त्यांच्या बियाण्याचा पुरवठा महाराष्ट्रात करण्यास प्रतिबंध केला आहे. महाबीजच्या सोयाबीन बियाण्याची प्रतीक्षा राज्यातील हजारो शेतकऱ्यांना असते. मात्र, हामंडळाने यंदा सोयाबीन बियाण्याचा केवळ २ लाख क्विंटल एवढाच पुरवठा बाजारात केल्याची माहिती पुढे आलेली आहे. प्रतिवर्षी ही सरकारी कंपनी ४ लाख क्विंटल बियाणे बाजारात देत असते.

Advertisement

Advertisement

बाजारातील एकूण बियाण्याची मागणी दरवर्षी सरासरी १२ ते १४ लाख क्विंटलची असते. यामध्ये सरासरी ४ लाख क्विंटल सोयाबीन बियाण्याचा पुरवठा महाबीजकडून होतो. मात्र, यंदा तोच निम्म्यावर आलेला आहे. त्यामुळे खासगी कंपन्या आणि शेतकऱ्यांना फसवणाऱ्या कृषी सेवा केंद्र चालकांना अच्छे दिन येणार असेच चित्र आहे. महाबीजचे सोयाबीन बियाणे यंदा नमुना चाचणीत मोठ्या प्रमाणात नापास झाले आहे. गेल्या दोन वर्षांपासून ऐन पीक काढणीच्या तोंडावर परतीच्या पावसाचा सोयाबीनला फटका बसल्याने असे झालेले आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply