Take a fresh look at your lifestyle.

मोदी-ठाकरे भेटीमुळे होणार ‘असे’; पहा फडणविसांनी नेमके काय म्हटलेय यावर

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल. या भेटी दरम्यान विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. राज्याच्या राजकीय विश्वातून आता प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही या भेटीबाबत प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस म्हणाले, की ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांची व्यक्तिगत भेट झाली असेल तर चांगली गोष्ट आहे. या भेटीमुळे राज्यास फायदाच होईल.’

Advertisement

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री अशोक चव्हाण यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. या भेटीनंतर पत्रकार परिषद घेत फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. ‘पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री ठाकरे यांची व्यक्तिगत भेट झाली किंवा नाही, याबाबत मला माहिती नाही. मात्र भेट झाली असेल तर चांगलेच आहे. ज्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ पंतप्रधानांच्या भेटीसाठी जात असते, त्यावेळी अशी भेट होत असते,’ असे फडणवीस यांनी सांगितले.

Advertisement

‘पंतप्रधान राज्याबद्दल नेहमीच सकारात्मक असतात. राज्य आणि केंद्र यांनी आपसातील संबंध चांगले ठेवले तर त्याचा फायदा राज्यालाच होणार आहे. राज्य सरकारने केंद्राकडे ज्या ११ मागण्या केल्या आहेत, त्यातील ७ ते ८ मागण्या राज्य संबंधित आहेत. त्यांचा केंद्राशी काहीच संबंध नाही. या सर्व मागण्या केंद्र सरकार संबंधित असत्या तर बरे झाले असते,’ असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, या भेटीनंतर राज्यातील राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. राज्यातील सत्ताधारी पक्षाचे नेते या भेटीतून अनेक मागण्या मार्गी लागणार असल्याचे सांगत आहेत. तर विरोधक मात्र यातून फारसे काही साध्य होणार नाही अस म्हणत आहेत. तरी देखील या मुद्द्यावर राज्यातील राजकारणात जोरदार चर्चा मात्र सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधकात आरोप प्रत्यारोप होत आहेत.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply